गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर

गौतम गंभीर नेहमी 'गंभीर' स्थितीत पाहायला मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 04:10 PM2024-05-15T16:10:15+5:302024-05-15T16:10:40+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2024 update KKR captain Gautam Gambhir has reacted to his fan's poster  | गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर

गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मार्गदर्शक आहे. केकेआरच्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममधून सूत्रे हलवणारा गंभीर नेहमी 'गंभीर' स्थितीत पाहायला मिळतो. आपल्या खेळाडूंचे कौतुक करताना त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येणे म्हणजे दुर्मिळच. तापट स्वभावासाठी ओळखला जाणारा गौतम गंभीर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मागील वर्षी विराट कोहली आणि त्याच्यामधील संघर्ष सर्वांसमोर आला. पण, यंदाच्या हंगामात या दोन्ही खेळाडूंनी गळाभेट घेऊन वादाला पूर्णविराम दिला. 

आयपीएलचा सतरावा हंगाम विविध कारणांनी खास आहे. षटकार आणि चौकारांचा पाऊस या हंगामात पाहायला मिळत आहे. काही अतिउत्साही चाहते भन्नाट पोस्टर झळकावून खेळाडूंसह कॅमेरामॅनचे लक्ष वेधत असतात. आता असाच एक पोस्टर समोर आला आहे, ज्यामध्ये संबंधित तरूणीने एक भारी कॅप्शन लिहिले आहे. या कॅप्शनने गौतम गंभीरला प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले.

 

केकेरआरच्या फॅनने सामन्यादरम्यान एक भन्नाट कॅप्शन असलेले पोस्टर झळकावले. तिने यावर लिहिले की, जोपर्यंत गौतम गंभीर हसत नाही तोपर्यंत मी माझ्या क्रशला प्रपोज करणार नाही. हे पोस्टर पाहून गौतम गंभीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. 

तरूणीने झळकवलेल्या पोस्टरचा फोटो शेअर करताना गंभीरने त्याचा एक हसतानाचा फोटो शेअर केला आहे. "इथे आहे पाहा", अशा आशयाचे त्याने बोलके कॅप्शन दिले. गंभीरच्या या पोस्टवर चाहते कमेंटच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. अनेकांनी मिश्किलपणे हास्यास्पद प्रतिक्रिया देऊन भारतीय दिग्गजाची फिरकी घेतली. 

Web Title: ipl 2024 update KKR captain Gautam Gambhir has reacted to his fan's poster 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.