मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 04:35 PM2024-05-16T16:35:46+5:302024-05-16T16:37:13+5:30

Jason Shah : संजय लीला भन्साळी यांची वेबसीरिज 'हीरामंडी' सध्या चर्चेत आहे. यात अभिनेता जेसन शाहने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Heeramandi actor Jason Shah opens up about his break-up with maharashtrian actress | मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची वेबसीरिज 'हीरामंडी' (Heeramandi) सध्या चर्चेत आहे. यातील सगळे कलाकार सध्या यश साजरे करत आहेत. या सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख, शर्मिन सहगल आणि अदिति राव हैदरी प्रमुख भूमिकेत आहेत. यांच्या व्यतिरिक्त फरीदा जलाल , श्रुति शर्मा , ताहा शाह बदुशा , शेखर सुमन , फरदीन खान आणि अध्ययन सुमन देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यात अभिनेता जेसन शाह(Jason Shah)ने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. दरम्यान आता जेसनने अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबतच्या ब्रेकअपवर मौन सोडले आहे.

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जेसन शाहने अनुषासोबतच्या ब्रेकअपवर मौन सोडले. मात्र यावेळी त्याने कोणत्या अभिनेत्रीचं नाव घेतलं नाही. जेसन म्हणाला की, तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर माझ्या जीवनात खूप मोठा अध्यात्मिक बदल झाला. ज्यामुळे मी समजूतदार झालो. खरं सांगू तर हा निर्णय मी खूप घाईत घेतला होता. खरंच मी याबद्दल विचारच केला नाही. मी विचार न करता कदाचित त्या रिलेशनशीपमध्ये गेलो होतो. त्या व्यक्तीला मी समजू शकलो नाही आणि मला वाटले की ती मला तिच्या चौकटीत फिट करण्याचा प्रयत्न करत आहे.

जेसनला पुढे विचारले की, आता तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का किंवा तू कोणाला सध्या डेट करतो आहेस का? यावर त्याने बोलणं टाळलं आणि नो कमेंट्स इतकंच उत्तर दिलं.

जेसन आणि अनुषा यांनी मार्च २०१७ मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले होते. दोघांनीही अनेक रोमँटिक फोटोंसोबत त्यांच्या प्रेमाची आणि नात्याची घोषणा केली होती जी नंतर डिलीट करण्यात आली होती. फोटोमध्ये अनुषा शर्टलेस जेसनसोबत पोज देताना दिसली होती. प्रेम फुलत असताना, दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि २०२१ मध्ये हे जोडपे वेगळे झाले. अनुषा जेसनपासून विभक्त होताच तिने करण कुंद्राला डेट करायला सुरुवात केली. 
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, अनुषा आणि करण लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांचे लवकरच ब्रेकअप झाले. आता करणचे नाव तेजस्वी प्रकाशसोबत जोडले गेले आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनुषा दांडेकर ही अभिनेत्री शिबानी दांडेकरची बहीण आहे. शिबानीने बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरसोबत लग्न केले आहे. 

Web Title: Heeramandi actor Jason Shah opens up about his break-up with maharashtrian actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.