पैसे काढल्यानंतर पर्स फेकून पळताना पाकीटमार पकडला; रेल्वे पोलिसांची कारवाई 

By नरेश रहिले | Published: May 15, 2024 07:40 PM2024-05-15T19:40:01+5:302024-05-15T19:44:01+5:30

प्रवाशाची पर्स हिसकावली होती.

Pickpocket caught throwing away wallet after withdrawing money Action of Railway Police | पैसे काढल्यानंतर पर्स फेकून पळताना पाकीटमार पकडला; रेल्वे पोलिसांची कारवाई 

पैसे काढल्यानंतर पर्स फेकून पळताना पाकीटमार पकडला; रेल्वे पोलिसांची कारवाई 

गोंदिया : प्रवाशाची पर्स हिसकावून त्यातील पैसे काढल्यानंतर तो पर्स फेकून पळत असताना रेल्वे पोलिसांनी पाकीटमाराला रंगेहाथ पकडले. येथील रेल्वेस्थानकावर मंगळवारी (दि.१४) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रवाशाद्वाराजवळ प्रवासी झोपत असून तेथे पाकीटमार मुकेश सुकालू कोसरे (३०, रा. वसुला घुमका, वॉर्ड क्रमांक-३, राजनांदगाव-छत्तीसगड) हा तिथल्या तिथे फिरत होता.

विशेष म्हणजे, रेल्वेस्थानकावर घडत असलेल्या अशा घटनांना आळा बसावा यासाठी विभागीय सुरक्षा आयुक्त आरपीएफ नागपूर यांच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या विभागीय कार्य पथकातील पोलिस हवालदार एच.आर. लाडे, शिपाई प्रीतम आदी रेल्वेस्थानकावर चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी तैनात होते. अशात त्यांना मुकेश कोसरे हा प्रवाशाची पर्स हिसकावून त्यातील पैसे काढल्यानंतर पर्स फेकून पळताना दिसला. यावर पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Web Title: Pickpocket caught throwing away wallet after withdrawing money Action of Railway Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.