मतदान वाढवणाऱ्या जनजागरण पथकांना विविध बक्षिसे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिली माहिती

By समीर देशपांडे | Published: April 29, 2024 04:28 PM2024-04-29T16:28:35+5:302024-04-29T16:30:47+5:30

कोल्हापूर : ज्या मतदारसंघात गेल्यावेळी लोकसभेसाठी राज्याच्या सरासरीपेक्षा म्हणजे ६० टक्केहून कमी मतदान झाले आहे. अशा ठिकाणी जर मतदान ...

Kolhapur Zilla Parishad CEO gave various prizes to Jan Jagaran teams for increasing voter turnout | मतदान वाढवणाऱ्या जनजागरण पथकांना विविध बक्षिसे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिली माहिती

मतदान वाढवणाऱ्या जनजागरण पथकांना विविध बक्षिसे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिली माहिती

कोल्हापूर : ज्या मतदारसंघात गेल्यावेळी लोकसभेसाठी राज्याच्या सरासरीपेक्षा म्हणजे ६० टक्केहून कमी मतदान झाले आहे. अशा ठिकाणी जर मतदान वाढवले तर त्या ठिकाणी जनजागरण करणाऱ्या पथकांना सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ही माहिती दिली.

गेल्यावेळी लोकसभेला २०१९ साली जिल्ह्यातील २५० मतदारसंघामध्ये ६० टक्केपेक्षा कमी मतदान झाले होते. याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या सर्व केंद्रांच्या परिसरात जनजागरण मोहिम राबवण्याच्या सुचना गेल्याच आठवड्यात देण्यात आल्या होत्या. यासाठी विद्यार्थ्यांची रॅली, पथनाट्य सादरीकरण, रांगाेळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. याच कमी मतदान झालेल्या २५० मतदान केंद्रांपैकी यंदा ज्या मतदान केंद्रावर ८५ टक्केच्यावर मतदान होईल त्यांना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या हस्ते सुवर्णपदकाने गौरवण्यात येणार आहे.

तर ८१ ते ८५ टक्के मतदान करवून घेणाऱ्या पथकांना रौप्य पदक तर ७० ते ८० टक्के मतदान करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पथकांना कास्यपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Kolhapur Zilla Parishad CEO gave various prizes to Jan Jagaran teams for increasing voter turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.