लोकसभा निवडणूक: उत्तर मध्य मुंबईत प्रिया 'दीदी' करणार काँग्रेसच्या उमेदवार वर्षा 'ताईं'चा प्रचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 07:26 PM2024-04-29T19:26:15+5:302024-04-29T19:30:37+5:30

वर्षा गायकवाड यांनी माजी खासदार प्रिया दत्त यांची निवासस्थानी भेट घेतली

Lok Sabha Election: Priya 'Didi' will campaign for Congress candidate Varsha 'Tai' in North Central Mumbai! | लोकसभा निवडणूक: उत्तर मध्य मुंबईत प्रिया 'दीदी' करणार काँग्रेसच्या उमेदवार वर्षा 'ताईं'चा प्रचार!

लोकसभा निवडणूक: उत्तर मध्य मुंबईत प्रिया 'दीदी' करणार काँग्रेसच्या उमेदवार वर्षा 'ताईं'चा प्रचार!

श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाविकास आघाडीच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार वर्षा गायकवाड यांनी सोमवारी काँग्रेस नेत्या, माजी खासदार प्रिया दत्त यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मी आणि माझे सर्व काँग्रेस कार्यकर्ते वर्षा गायकवाड यांचा प्रचार करणार असल्याचे प्रिया दत्त यांनी सांगितले. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात दोन वेळा खासदार राहिलेल्या प्रिया दत्त यांचा मोठा मतदारवर्ग आजही येथे आहे. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फटका निवडणुकीत बसल्याने अपयश पदरी पडलेल्या प्रिया दत्त गेल्या काही वर्षापासून सक्रिय राजकारणापासून जरा दूर राहत होत्या.

दरम्यान, उत्तर मध्य मुंबईत प्रचारा दरम्यान वर्षा गायकवाड यांनी त्याची भेट घेत आशीर्वाद घेतले. प्रिया दत्त माझ्या मोठ्या बहिणी सारख्या आहेत. त्यांचा अनुभव मला निवडणुकीत उपयोगी पडेल आणि त्या माझा प्रचारही करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Lok Sabha Election: Priya 'Didi' will campaign for Congress candidate Varsha 'Tai' in North Central Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.