एका वर्षभरात ८४ हजारावर नवीन वीज जोडणी

By आनंद डेकाटे | Published: April 29, 2024 06:46 PM2024-04-29T18:46:29+5:302024-04-29T18:48:14+5:30

Nagpur : महावितरणने ६५,०२७ घरांमधील अंधारही दूर केला; ४२ चार्जिंग स्टेशनलाही वीज

84 thousand new electricity connections in one year | एका वर्षभरात ८४ हजारावर नवीन वीज जोडणी

84 thousand new electricity connections in one year

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात महावितरणने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर परिमंडळात ८४,६७२ नवीन वीज कनेक्शन दिले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६५,०२७ घरगुती, १०,५०७ व्यावसायिक, १३४९ औद्योगिक आणि ५,५५१ कृषी जोडण्यांचा समावेश आहे. या कालावधीत महावितरणने ४२ चार्जिंग स्टेशनलाही वीज दिली.


महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ग्राहक सेवा अधिक गतिमान व्हावी यासाठी तात्काळ नवीन कनेक्शन देण्यावर भर दिला आहे. या संदर्भात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वाखाली ‘इज ऑफ लिव्हिंग’ ही संकल्पना साकार करण्यासाठी तातडीने कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सरासरी सत्तर हजार जोडण्या देत असलेल्या कंपनीने २०२३-२४ या वर्षात ८४,६७२ नवीन कनेक्शन दिले. या मोहिमेचा वरिष्ठ स्तरावर नियमित आढावा घेण्यात आला. विशेषत: मीटरची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. कुक्कुटपालन केंद्र, हातमाग, शीतगृह, सार्वजनिक सेवा, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे, धार्मिक व इतर वर्गवारीत २१९६ वीज जोडण्या देण्यात आल्या. मुख्य अभियंता दिलीप दोडके म्हणाले की, कंपनीचे अभियंते, अधिकारी व अधिकारी ग्राहकांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत.


कुठे आणि किती कनेक्शन दिले
श्रेणी - नागपूर ग्रामीण - नागपूर शहर - वर्धा - एकूण
घरगुती - १६,९७९ - ३८,८५८ - ९१९० - ६५,०२७
व्यावसायिक - १९६३ - ६,६७० - १८७४ - १०,५०७
औद्योगिक - ४९६ - ६१३ - २४० - १३४९
कृषी - २,७४३ - २३४ - २५७४ - ५, ५५१
चार्जिंग स्टेशन - १० - २९ - ०३ - ४२
इतर - ७२४ - १०५८ - ४१४ - २,१९६
एकूण - २२,९१५ - ४७,४६२ - १४,२९५ - ८४,६७२

 

Web Title: 84 thousand new electricity connections in one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.