स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 07:03 PM2024-04-29T19:03:19+5:302024-04-29T19:45:47+5:30

पुणे तिथे काय उणे म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरूवात केली.....

"His soul is wandering as his dreams are not fulfilled..." Narendra Modi's criticism of Sharad Pawar in the Grand Alliance meeting | स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा

स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा

पुणे : गेल्या साठ वर्षात काँग्रेसने देशातील नागरिकांना मुलभूत सुविधाही दिल्या नव्हत्या. पण आम्ही दहा वर्षांत देशातील नागरिकांना मुलभूत सुविधा दिल्या. देशात लवकरच बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. केवळ दहा वर्षांत सव्वा लाखांपेक्षा जास्त स्टार्ट अप सुरू केले आहेत. यातील अनेक स्टार्ट अप पुण्यातील आहेत. देशात नवीनता (innovations) वाढविण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वी भारतात मोबाईलची आयात केली जात होती. पण आता आपण देशातील दुसऱ्या क्रमांकाचे निर्यातदार झालो आहोत. भारताला सेमीकंडक्टर, इनोव्हेशन, एनर्जी हब बनवायचे आहे, अस पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज (२९ एप्रिल) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे तिथे काय उणे म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरूवात केली.

पंतप्रधान मोदींची सभा वानवडी येथील रेसकोर्स मैदानावर झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार, श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील त्याचबरोबर मंत्री चंद्रकांत पाटील, निलम गो-हे, मनसेचे अमित ठाकरे, हर्षवर्धन पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. 

सर्वसामान्यांना बँकांचे दरवाजे उघडले -

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात संशोधन करणाऱ्यांसाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षात देशातील महागाई नियंत्रणात आणली. भारत आज देशात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. देशातील सत्तर वर्षांवरील नागरिकांवर मोफत उपचार केले जाणार. तसेच औषधेही सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सरकारने सर्वसामान्यांसाठी देशातील बँकांचे दरवाजे उघडले. पथारी व्यावसायिक तसेच छोट्या व्यावसायिकांना कर्जांचे वाटप करण्यात आल्याचा दावा मोदींनी केला.

शरद पवारांचे नाव न घेता टीका-

ज्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत त्यांचे आत्मे भटकत राहतात. ४५ वर्षांपूर्वी आपल्या महत्वकांक्षापोटी अस्थिर करण्याच्या खेळाची सुरूवात केली. तेंव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. त्यानंतर राज्यातील अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत. ते विरोधकांसोबत त्यांच्या पार्टीला आणि त्यांच्या परिवाराला अस्थिर करत आहेत. १९९५ साली भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यावेळीही तो आत्मा त्या सरकारला अस्थिर करत होता. आता फक्त राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचे काम हा आत्मा करत आहे, अशी टीका मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केली. 

धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही-

विरोधक धर्माचे राजकारण करत आहेत. काँग्रेसने नेहमीच सविंधानाचा अपमान केला. सविंधान दिवस साजरा करण्यास काँग्रेसचा विरोध होता. काँग्रेसचा देशातील गरिबांच्या संपत्तीवर डोळा आहे. इंडिया आघाडी धर्माच्या आधारावर देशात फूट पाडत आहे. ज्यांना सविंधानाच्या आधारे आरक्षण मिळाले आहे त्यांचे आरक्षण काढून मुसलमानांना आरक्षण देणार आहे असं म्हणाले. याचा प्रत्यय कर्नाटकात आला आहे. देशात मी कधीही धर्माच्या आधारावर आरक्षण लागू होऊ देणार नाही.  

साठ वर्षात काँग्रेसने देश बुडविला-

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्राण जाये पर वचन ना जाये, असं पंतप्रधान मोदींचे वागणे आहे. मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. मोदींनी देशवासियांना दिलेले शब्द पूर्ण करून दाखवला. कलम ३७० तसेच राम मंदिराचा मुद्दा त्यांनी सोडविला. दुसरीकडे काँग्रेसने साठ वर्ष देश बुडविला होता. काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट, भ्रष्टाचार होत होता, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. २०१४ नंतर देशात शांतता नांदली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मोदींनी देशाचा गौरव वाढविला. विश्वास आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदी आहे असंही ते म्हणाले.

विरोधकांकडून चुकीचा प्रचार -

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील विकासाचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे गरजेचे आहे. केंद्रात भाजपचे सरकार आले तर राज्यातील विकासकामे वेगात होण्यास मदत होईल. दुसरीकडे सध्या विरोधक चुकीचा प्रचार करत आहेत. कोणीही सविंधान बदलणार नाही. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याचे ते चुकीचा प्रचार करत असल्याचे पवार म्हणाले.

इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी चेहराच नाही-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजची सभा ही पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा आहे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही. तसेच त्या आघाडीत सामान्यांना स्थान नाही म्हणत इंडिया आघाडीवर टीका केली. पुढे ते म्हणाले, मोदींनी देशात मेक इन इंडियाचा नारा देत स्वदेशी बनावटीच्या वस्तू वाढवल्या. आज आपण संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होत आहोत. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा वाटा मोठा आहे. भविष्यात पुण्यात टेक्नॉलॉजी हब बनवण्यात येणार आहे.  

Web Title: "His soul is wandering as his dreams are not fulfilled..." Narendra Modi's criticism of Sharad Pawar in the Grand Alliance meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.