महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

By दीपक शिंदे | Published: April 29, 2024 04:05 PM2024-04-29T16:05:21+5:302024-04-29T16:06:15+5:30

महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी पर्यटकाची तुबंड गर्दी

Brother and sister injured after falling from horse in Mahabaleshwar | महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी पर्यटकाची तुबंड गर्दी होते. परंतु शुक्रवार, दि. २६ रोजी एक कुंटुब महाबळेश्वरला फिरण्यास आले होते. या दरम्यान कुटुंबातील बहीण-भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

महाबळेश्वरमध्ये एप्रिल-मे हंगामास प्रारंभ झाला असून, लाखो पर्यटक महाबळेश्वरला येऊ लागले आहेत. दिवसभर पॉइंट भ्रमंती करून सायंकाळी पर्यटक वेण्णालेक येथे नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी येतात. दरम्यान, कुटुंबातील बहीण-भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत जाब विचारला असता घोडेस्वाराने अर्वाच्य भाषेत पर्यटकास शिवीगाळ केली.

महाबळेश्वरमध्ये घोडेस्वारांना ड्रेस कोड आहे; परंतु कोणीही युनिफॉर्म घालत नाही. घोडेवाले व पर्यटक यांच्या सतत वाद होतात. घोडेवाले पर्यटकांना घोड्यावर बसवून सोडून देतात, अशावेळी घोडा अनियंत्रित होतो आणि मग अपघात होतो. जखमी पर्यटकांची कोणीही साधी दखल घेत नाही. अपघाताचे प्रमाण वाढले असून, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पालिका आणि पोलिस प्रशासन या घटनेची दखल घेत नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाबळेश्वर शहर परिसरात १५० घोडे असून, घोडेस्वारी करतेवेळी हेल्मेट सक्तीचे करावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल..

अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या घटनेमुळे महाबळेश्वरच्या पर्यटनावर परिणाम होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. अशा घटना पुन:पुन्हा घडू नये, यासाठी पालिका आणि पोलिस प्रशासन यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिक व्यक्त करीत आहेत.

Web Title: Brother and sister injured after falling from horse in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.