सावंतवाडीत माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी टाकीवर चढले

By अनंत खं.जाधव | Published: May 16, 2024 09:48 PM2024-05-16T21:48:44+5:302024-05-16T21:49:01+5:30

मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

A unique movement of former corporators in Sawantwadi, climbed the tank for citizens' water issue | सावंतवाडीत माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी टाकीवर चढले

सावंतवाडीत माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी टाकीवर चढले

सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषद चे माजी नगरसेवक विलास जाधव यांनी पाण्यासाठी गुरूवारी सायंकाळी थेट टाकीवर चढत अनोखे आंदोलन केले  जोपर्यंत पाणीपुरवठा नियमित होत नाही, तो पर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.त्यामुळे नगरपरिषद प्रशासन व पोलिसांची चांगलीच पळापळ झाली अखेर टाकीत दररोज एक लाख लिटर पाणी सोडले जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिल्यानंतर जाधव यांनी आपले उपोषण मागे घेतले मात्र पुन्हा असाच प्रकार घडल्यास टाकीवर चढणार तो खालीच येणार नाही असा इशारा नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.

याबाबत माहिती अशी गेले अनेक दिवस येथील समाज मंदिर परिसरात पालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पाण्याचा पुरवठा अनियमितपणे सुरू आहे. वारंवार याकडे पालिका प्रशासन व कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधून सुद्धा लक्ष दिले जात नाही, त्यामुळे संतापलेल्या जाधव यांनी अनोखी शक्कल काढत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी थेट समाज मंदिर परिसरात असलेल्या उंच टाकीवर चढून आपले आंदोलन सुरू केले. आपण गेले महिनाभर लोकांच्या तक्रारींमुळे हैराण झालो. समाजमंदीर, मोरडोंगरी, गरड परिसरात पाणीच येत नाही, त्यामुळे याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे योग्य लक्ष देण्यात आला नाही त्यामुळे आपण थेट टाकीवर चढून बसलो.असे जाधव यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा जाधव यांनी घेतला  १ लाख हजार क्षमता असलेल्या टाकीत १० हजार लिटर सुद्धा पाणी भरलेले नाही, त्यामुळे लोकांना पाणी मिळणार कसे? असा सवाल करत जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता.

अखेर सायंकाळ च्या सुमारास मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या सह नगरपरिषद चे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच दररोज टाकीत एक लाख लिटर पाणी साठवणूक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर जाधव हे शांत झाले आणि आपले आंदोलन मागे घेत खाली उतरले.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सुरेश भोगटे उमाकांत वारंग याच्या सह पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यांनीही जाधव यांना समजवण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: A unique movement of former corporators in Sawantwadi, climbed the tank for citizens' water issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.