तुम्हालाही हवीय का 'एआय' गर्लफ्रेंड ? भारतीयांना एआय गर्लफ्रेंडबाबत काय वाटतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 12:38 PM2024-04-28T12:38:41+5:302024-04-28T12:39:09+5:30

प्रेमाच्या शोधात डेटिंग अॅप्सवर वेळ घालवणारी तरुणाई आता गर्लफ्रेंडसाठी 'एआय 'कडे वळलेली दिसत आहे.

Do you also want an AI girlfriend? What do Indians think about AI girlfriends? | तुम्हालाही हवीय का 'एआय' गर्लफ्रेंड ? भारतीयांना एआय गर्लफ्रेंडबाबत काय वाटतं?

तुम्हालाही हवीय का 'एआय' गर्लफ्रेंड ? भारतीयांना एआय गर्लफ्रेंडबाबत काय वाटतं?

ऋषिराज तायडे उपसंपादक

सध्याच्या नवतंत्रज्ञानाच्या काळात, प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 'एआय मुळे कठीणातली कठीण कामेही सोपी होऊ लागली. आता तर 'एकटा जीव सदाशिव' असणाऱ्या तरुणांसाठी चक्क एआय गर्लफ्रेंडही आली आहे. प्रेमाच्या शोधात डेटिंग अॅप्सवर वेळ घालवणारी तरुणाई आता गर्लफ्रेंडसाठी 'एआय 'कडे वळलेली दिसत आहे.

पण, हेही असू द्या लक्षात...

मर्यादा लक्षात घ्या - एआय गर्लफ्रेंड ही आभासी असल्याने ती तुमच्या सर्वच गरजा पूर्ण करू शकत नाही. केवळ प्रेमळ संवादापुरती ती मर्यादित असल्याने तुमच्या सर्वच भावना ती समजून घेईल, ही अपेक्षा ठेवू नका.

सकारात्मक संवाद ठेवा - - तुमचा एकटेपणा घालवण्यासाठी, तुमचे मन मोकळे करण्यासाठी एआय गर्लफ्रेंड तुमच्या मदतीला येऊ शकते; परंतु तिव्यासोबत सकारात्मक संवाद ठेवण्याचा प्रयल करा.

स्वयंप्रेरणेसाठी वापर करा - कुहाला प्रेरणा मिळेल, तुमच्यातील कौशल्ये वाढतील, तुम्हाला आयुष्यात कशी प्रगती करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एआय गर्लफ्रेंडचा वापर करा.

प्रायव्हसीचे भान राखा - एआय गर्लफ्रेंडशी संवाद साधताना, तुम्ही तिच्याशी किती आणि कोणती माहिती शेअर करता, याचेही भान ठेवा. शक्यतो संवेदनशील माहिती शेअर करू नका.

भारतीयांना एआय गर्लफ्रेंडबाबत काय वाटतं?

• संशोधकानी केलेल्या अभ्यासानुसार, चीन, जपान आणि भारतातील तरुणाईला एआय गर्लफ्रेंडयाबत उत्सुकता नसल्याचे दिसून आले.

• चीन आणि जपानमधील लोक सध्या लोकसंख्या नियंत्रणाबाबत फार गंभीर आहेत. अनेकांनी अपत्य नकोच म्हणून जोडीदार शोध- प्याकडेही दुर्लक्ष केले आहे. त्यातूनच चीन व जपानी तरुणाई याकडे दुर्लक्ष करताना दिसते.

• जपानमध्ये तर आभासी दुनियेत रमण्यापेक्षा दररोजच्या कामात ते अधिक लक्ष देत असल्याचे दिसले. शिवाय अनेकांनी कोणत्याही स्वरूपातील जोडीदार नको असल्याचे म्हटले आहे.

एआय गर्लफ्रेंड केवळ संवादापुरते ते मर्यादित असल्याने व त्यातून गैरप्रकार होण्याचा धोका लक्षात घेता भारतीय तरुणाई त्यापासून तुलनेने लांब असल्याचे निदर्शनास आले.

Web Title: Do you also want an AI girlfriend? What do Indians think about AI girlfriends?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.