"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 05:39 PM2024-05-15T17:39:28+5:302024-05-15T17:40:02+5:30

सध्या प्रियंका गांधी रायबरेली आणि अमेठी या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात प्रचार करत आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून तर गांधी घराण्याचे प्रतिनिधी किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवत आहेत.

Priyanka Gandhi lashes out at Amit Shah and says Didn't go for the vacation trip thailand | "फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं

"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं

राहुल गांधी आणि प्रियांकां गांधी दर 3 महिन्याला परदेशात सुट्टीवर जातात. प्रियांका गांधी नुवडणूकीच्या काळात थायलंडमधून सुट्टीवर जाऊन आल्या. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, ज्यांनी गेल्या 23 वर्षांत दिवाळीलाही सुट्टी घेतलेली नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या 20 एप्रिलला राजस्थानातील भीलवाडा येते म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी भडकल्या आहेत. "जर त्यांच्याकडे संपूर्ण माहिती आहे, तर मग ते खोटं का बोलता आहेत? असा प्रश्न विचारत, आपण आपल्या मुलीला भेटण्यासाठी थायलंडला गेलो होतो. जे अमित शाह प्रचारसभांमध्ये सांगत आहेत," असे प्रियांका यांनी म्हटले आहे.

सध्या प्रियंका गांधी रायबरेली आणि अमेठी या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघात प्रचार करत आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून तर गांधी घराण्याचे प्रतिनिधी किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. गांधी कुटुंब केवळ निवडणुकीसाठीच अमेठी आणि रायबरेलीमध्ये येते, असा आरोप भाजप करत आहे. या आरोपावर बोलतान प्रियांका म्हणाल्या, "हे अजिबात खरे नाही. अमित शाह यांना तर बऱ्याच गोष्टी माहीत असतात.  विशेषत: महिलांबद्दल. त्या कुठे जातात, कोणाला भेटतात? काही दिवसांपूर्वी मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी थायलंडला गेले होते. जे ते त्यांच्या निवडणूक सभेत सांगत होते. पण अमित शहा यांनी सांगावे, की त्यांना ही माहिती कशी मिळाली? जर त्यांना सर्व माहिती असते, तर मग खोटं का बोलतात"

रविवारी रायबरेली येथील सभेत अमित शहा यांनी आरोप केला होता की, सोनिया गांधी यांनी खासदार निधीतील 70 टक्के निधी अल्पसंख्यकांवर खर्च केला. रायबरेली गेल्या अनेक वर्षांपासून नेहरू-गांधी घराण्याला विजयी करत आहे. मात्र, सोनिया गांधी अथवा त्यांचे कुटुंबीय निवडणूक जिंकल्यानंतर कितीवेळा रायबरेलीमध्ये येतात. रायबरेलीमध्ये तीन डझनवर मोठे अपघात झाले पण गांधी कुटुंब आले का? असा सवालही शाह यांनी यावेळी केला. तसेच, भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांना विजयी करण्याचे आवाहनही केले.

रायबरेली आणि अमेठीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होत आहे. 18 मे रोजी येथे निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावतील. अमेठीमध्ये भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर अमेठीचे तीन वेळा खासदार राहिलेले राहुल गांधी यावेळी केरळमधील वायनाड आणि त्यांची आई सोनिया गांधी यांच्या रायबरेली जागेवरून लढत आहेत. स्मृती इराणी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा 55 हजार मतांनी पराभव केला होता.

Web Title: Priyanka Gandhi lashes out at Amit Shah and says Didn't go for the vacation trip thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.