Mahashivratri2018: महाशिवरात्रीला 'या' 12 गोष्टी करू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 06:21 PM2018-02-12T18:21:06+5:302018-02-13T11:28:26+5:30
भगवान शिव जेवढ्या लवकर प्रसन्न होतात तेवढ्याच लवकर ते क्रोधीतही होतात. त्यामुळं महाशिवरात्रीला या 12 गोष्टी कधीही करू नका....
Next
मुंबई - जगभरातील समस्त शिवप्रेमींसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्यामुळे या दिवशी करायची व्रत-वैकल्ये, पूजा आणि मुहूर्त याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. उद्या (मंगळवार) महाशिवरात्र आहे. हिंदू लोक हा दिवस एका सणाप्रमाणे साजरा करतात. अनेक जण दिवसभर उपवास करतात. या दिवशी भगवान महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, भगवान शिव जेवढ्या लवकर प्रसन्न होतात तेवढ्याच लवकर ते क्रोधीतही होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियम कटाक्षाने पाळण्याची पद्धत अनेक कुटुंबांमध्ये पूर्वापार चालत आली आहे. त्यापैकी काही नियम असे...
- महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठावे, उशिरापर्यंत झोपू नये. त्याचप्रमाणे आंघोळ केल्याशिवाय काही खाऊ नये.
- तुम्ही जर शिवरात्रीचा उपवास धरला असेल तर लवकर उठून गरम पाण्यानं आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालून शंकराची पूजा करावी.
- शिवरात्रीला गहू, भात आणि डाळीपासून तयार झालेले पदार्थ खाऊ नये. उपवास केला असेल तर फळ, दूध, चहा, कॉफी यांचे सेवन करावे.
- काळे कपडे घालू नका
- शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये, असंही मानलं जातं.
- महाशिवरात्रीच्या रात्री शंकराचे भजन, आरती करावी. उपवास धरला असेल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून सोडावा.
- शिवलिंगावर तुळशीपत्र किंवा पॅकेटमधील दूध कधीच अर्पण करू नये. शिवलिंगावर नेहमी थंड दूध अर्पण करावं.
- शिवलिंगावर केतकी आणि चंपा ही फूल अर्पण करू नयेत.
- पूजेला तुटलेला किंवा अर्धवट तांदूळ वापरू नये.
- शिवलिंगावर सर्वात पहिल्यांदा पंचामृत अर्पण करावे. दूध, दही, गंगाजल, केसर, मध आणि पाणी यापासून तयार झालेलं पंचामृत वापरावं.
- तीन पानाचे बेलपत्र अर्पण करावं. त्यामध्ये एकही पानं तुटलेलं नसावे. बेलपत्राचे तोंड आपल्याकडे असावे. शिवलिंगावर फक्त पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावं.
- शिवलिंगावर कुंकवाचा टिळा लावू नये.