Lokmat Agro >हवामान > ८४ लाख रुपये खर्चुन ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या धरणाला पूर्ण होणार १०० वर्ष; जाणून घ्या इतिहास

८४ लाख रुपये खर्चुन ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या धरणाला पूर्ण होणार १०० वर्ष; जाणून घ्या इतिहास

This dam, built by the British at a cost of Rs 84 lakh, will complete 100 years; Know the history | ८४ लाख रुपये खर्चुन ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या धरणाला पूर्ण होणार १०० वर्ष; जाणून घ्या इतिहास

८४ लाख रुपये खर्चुन ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या धरणाला पूर्ण होणार १०० वर्ष; जाणून घ्या इतिहास

अवघे ८४ लाख रुपये खर्चुन हे धरण १९२६ ला पूर्ण झाले. आधी शेती सिंचनासाठी कालवे व नंतर गूळ-चुनाखडी वापरून दगडात धरणाची उभारणी झाली.

अवघे ८४ लाख रुपये खर्चुन हे धरण १९२६ ला पूर्ण झाले. आधी शेती सिंचनासाठी कालवे व नंतर गूळ-चुनाखडी वापरून दगडात धरणाची उभारणी झाली.

शेअर :

Join us
Join usNext

हेमंत आवारी
अकोले : भंडारदरा धरण उभारणीस यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिशकालीन धरणाचा पाठीचा कणा आजही ताठ असून स्थापत्य शास्त्राचा हा अप्रतिम ठेवा आहे.

अवघे ८४ लाख रुपये खर्चुन हे धरण १९२६ ला पूर्ण झाले. आधी शेती सिंचनासाठी कालवे व नंतर गूळ-चुनाखडी वापरून दगडात धरणाची उभारणी झाली.

१८७५ मध्ये श्रीरामपूर-राहाता भागात पाण्यासाठी कालवे झाले. त्या पाटाला पाणी मिळावे म्हणून संगमनेर तालुक्यात ओझर येथे १८८५ ला पिकअप वॉल बांधण्यात आली.

१९०५ ला धरणाच्या जागेचे सर्वेक्षण होत १९१० ला भंडारदरा धरणाच्या कामास सुरुवात झाली आणि विल्सन डॅम १९२६ ला पूर्णत्वास गेला.

त्यावेळी साधन सामग्री फारशी नसतानाही केवळ १६ वर्षात १० हजार ८६ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे दगडी धरण तयार झाले.

४७ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र असलेल्या धरणाच्या भिंतीची उंची २७८ फूट असून केवळ ८४ लाख १४ हजार १८८ रुपये धरणासाठी खर्च झाले आहेत.

२३ हजार ७७ हेक्टर सिंचन
- क्षमतेच्या भंडारदरा धरणाची आधी कालवे मग धरण अशी ख्याती आहे.
- ओझर उन्नेय बंधाऱ्यापासून पुढे डावा कालवा ७६ व उजवा कालवा ५३ किलोमीटर लांबीचा आहे.
- १९७३ ला भंडारदरा धरणाच्या भिंतीचे बळकटीकरण करण्यात आले.
- त्यात १३१ बोअर घेऊन शिसे ओतण्यात आले असून त्यामुळे ५४० टनाने भिंतीची दाब क्षमता वाढली आहे.
- १९४ बोअर घेऊन त्यात प्री स्ट्रेस केबल टाकण्यात आली आहे.
- केबलचे वजन २१० टन व लांबी १० हजार ५५३ फूट आहे.
- बळकटीसाठी १४ बटरेस बांधण्यात आले आणि स्पील वे गेट बसविण्यात आले.
- यातून प्रति सेकंदाला ५३ हजार क्युसेक पुराचे पाणी वाहून जाऊ शकते.

स्वित्झर्लंड बनावटीचे व्हॉल्व्ह
- सह्याद्रीचा काळा पाषाण बेसॉल्ट खडकावर ८५ मीटर उंचीचा ११०३९ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा कवेत घेऊन धरण दिमाखात उभे आहे.
- स्वित्झर्लंड बनावटीचे व्हॉल्व्ह बसवून सिंचन मोऱ्या तयार केलेल्या आहेत.
- येथील खडकाची दाब सहन करण्याची क्षमता ७ हजार मेट्रिक टन इतकी आहे.
- बुडीत पाणलोट २१ किलोमीटर लांब असून जवळपास ६० मीटरपर्यंत पाण्याचा दाब असतो.
- पाण्याचा ६० टक्के दाब जवळच्या टेकडीवर स्थिरावतो.
- केवळ ४० टक्के दाब हा भिंतीवर येतो, असे इंजिनिअरिंग तंत्र या धरणासाठी वापरण्यात आले आहे.
- कोकणात पाणी वाहून जाऊ नये म्हणून ब्रिटिशांनी साम्रदजवळ ३५० मीटर लांबीचा सॅडल डॅमही बांधला आहे.

३९ गाण्यांचे चित्रीकरण
- १९४० पासून १०४ चित्रपटांचे व ३९ गाण्यांचे चित्रीकरण भंडारदरा, रंधा परिसरात झाले आहे.
- तुफानी, १९८५ ला गाजलेल्या राम तेरी गंगा मैली चित्रपटातील 'तुझे बुलाये ये मेरी बाहे.. 'सह इतर गाण्यांचे चित्रीकरण भंडारदरा धरणाच्या बागेत प्रसिद्ध अम्ब्रेला फॉलजवळ झाले.
- अभिनेत्री मंदाकिनी यातून रुपेरी पडद्यावर झळकल्या.
- धरणभिंतीच्या पायथ्याला असलेल्या या बागेत 'सजनी ग भुललो मी, काय जादू झाली' हे भिंगरी या मराठी चित्रपटातील सुषमा शिरोमणी व विक्रम - गोखले यांच्या अभिनयात साकारलेले गीत आजही अनेकांच्या ओठी आहे.
- कुर्बान, प्रेम या सिनेमांचे चित्रीकरण, तसेच ये धरती चाँद सितारे हे गीत रंधा धबधब्याजवळच चित्रित झाले.

अधिक वाचा: कृषी पाठोपाठ आता महसूल विभागानेही घेतला हा निर्णय; नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याकडे पाहिजे हा नंबर

Web Title: This dam, built by the British at a cost of Rs 84 lakh, will complete 100 years; Know the history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.