अकोलेमधील बाजारपेठा बंद ठेऊन संपास पाठींबा, माधव भंडारी यांच्या पुतळ््याचे दहन

By Admin | Published: June 1, 2017 02:57 PM2017-06-01T14:57:35+5:302017-06-01T14:57:35+5:30

शेतकरी राज्यव्यापी बंदचे तीव्र पडसाद अकोले तालुक्यातही उमटला.

Combustion of the statue of Madhav Bhandari by Samasam Sethimbha, keeping the markets closed in Akole | अकोलेमधील बाजारपेठा बंद ठेऊन संपास पाठींबा, माधव भंडारी यांच्या पुतळ््याचे दहन

अकोलेमधील बाजारपेठा बंद ठेऊन संपास पाठींबा, माधव भंडारी यांच्या पुतळ््याचे दहन

नलाइन लोकमत अकोले(अहमदनगर) दि.१शेतकरी राज्यव्यापी बंदचे तीव्र पडसाद अकोले तालुक्यातही उमटला. कोतुळ परिसरातील गावातील शेतकरी एकत्र येऊन मुख्य चौकात दूध ओतले तर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या पुतळ्यास चपलांचा हार घालून दहन करण्यात आले. मुख्य चौकात साडे दहा वाजेपर्यंत रस्ता रोको केला. शेतक-यांवर बेताल वक्तव्य करणा-या नेत्यांना पदावरून दूर करावे यासाठी एकशे वीस लिटर दूध रस्त्यावर ओतले. भाजपनेते माधव भंडारीं यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, राजेंद्र देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सिताराम देशमुख उपस्थित होते. ब्राह्मणवाडा येथील शेतकरी संपात सहभागी झाला. स्वयंस्फूतीर्ने दुधसंकलन व भाजीपाला विक्री बंद ठेवून तसेच रस्त्यावर दूध ओतून संपात सहभाग नोंदवला. एकाही शेतक-याने आपला भाजीपाला ओतूर मार्केटला नेला नाही. ब्राह्मणवाडा गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संचलित तसेच श्रीकृष्ण दूध डेअरी व खासगी दूध संकलन केंद्रांनी स्वयंस्फूतीर्ने दूध संकलन बंद ठेवले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सर्व दूध उत्पादक शेतकरी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी एकत्र येत कोतूळ-ब्राह्मणवाडा रस्त्यावर दूध ओतून राज्य शासनाचा निषेध केला. या आंदोलनात उपसरपंच भारत आरोटे, श्रीकृष्णचे संस्थापक लक्ष्मण आरोटे, गोकूळ आरोटे अध्यक्ष धोंडिभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष भीमा आरोटे, सोसायटीचे अध्यक्ष पोपट हांडे, उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, बबन फलके, माजी सरपंच देवराम गायकर व शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: Combustion of the statue of Madhav Bhandari by Samasam Sethimbha, keeping the markets closed in Akole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.