छिंदमला मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 12:36 PM2018-12-30T12:36:06+5:302018-12-30T12:37:02+5:30

अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकांवेळी श्रीपाद छिंदमने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते.

FIR lodged against Shivsena corporators who have been assaulting Shripad Chhindam | छिंदमला मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

छिंदमला मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर - शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक योगिराज गाडे, अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले, विजय पठारे, अनिल शिंदे व अन्य चार जणांविरुद्ध शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी स्वत: श्रीपाद छिंदमने फिर्याद दाखल केली होती. 

अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकांवेळी श्रीपाद छिंदमने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी सभागृहातच छिंदमला मारहाण केली होती. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमचे मत आम्हाला नको, तसेच हा जाणीवपूर्वक मतदान करत असल्याचं शिवसेना नगरसेवकांनी म्हटलं होतं. मात्र, शिवेसनेकडून मला मतदान मागण्यात आल्याची ऑडिओ क्लीप छिंदम याने व्हायरल केली होती. त्यामुळे या प्रकरणातील शिवसेनेचा दुटप्पीपणा उघडा पडला. त्यानंतर, छिंदमने नगरसेवक योगिराज गाडे, अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले, विजय पठारे, अनिल शिंदे व अन्य चार अशा आठ जणांविरुद्ध मारहाण करणे, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे या कलमानुसार फिर्याद दिली. त्यानुसार येथील तोफखाना पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, नगरसेवक गाडे व इतर नगसेवक छिंदमवर धावून आले. त्याला हाताने मारण्यास सुरुवात केली. त्याचा चष्मा फोडला. तो धावत पिठासीन अधिकारी द्विवेदी यांच्याकडे गेला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या नगरसेवकांनी शिवीगाळ करत मला व माझ्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली, असे छिंदमने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही छिंदमने केली. 
 

Web Title: FIR lodged against Shivsena corporators who have been assaulting Shripad Chhindam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.