ज्याच्याशी ठरवशील लग्न, त्याला मारून टाकील; साता-याच्या तरुणाने फेसबुकवरुन दिला नगरमधील मुलीच्या भावाला दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:40 PM2017-12-06T13:40:46+5:302017-12-06T13:43:53+5:30
बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून तरूणीच्या नावे तिच्याच भावाला धमकीचे मेसेज पाठविल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यात सातारा येथील तरूणाविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर : बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून तरूणीच्या नावे तिच्याच भावाला धमकीचे मेसेज पाठविल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यात सातारा येथील तरूणाविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा येथील आकाश शरद सोनटक्के याने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील २४ वर्षीय तरूणीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून तिचा फोटो वॉलपेपरवर ठेवला़ या अकाऊंटच्या माध्यमातून त्याने ३० आॅगस्ट रोजी तरूणीच्या भावाला मेसज करून ‘तू तुझ्या बहिणीचे लग्न कुठेही ठरविण्याचा प्रयत्न केला तर मी ते लग्न मोडून टाकेल तसेच ज्या मुलाशी तू तुझ्या बहिणीचे लग्न ठरवशील त्याला मी मारून टाकेल’ अशी धमकी दिली. या प्रकरणी सदर तरूणीने येथील मंगळवारी येथील सायबर पोलीस ठाण्यात सोनटक्के याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुनील पवार हे करत आहेत.
महिलांना त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून बदनामी करण्याचे प्रकार वाढले आहेत़ व्हॉटसअॅप, टिष्ट्वटर अथवा फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोंचाही गैरवापर होत आहे.
महिन्याला दहा तक्रारींचे प्रमाण
सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी, धमकी अथवा ब्लॅकमेलिंगच्या घटनांबाबत येथील सायबर पोलीस ठाण्यात महिन्याला किमान दहा तक्रार अर्ज दाखल होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या बाबत सर्वाधिक या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर वर्षभरात सायबर पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुनील पवार व त्यांचे टीमने अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे उघडकिस आणून आरोपींना अटक केली आहे.