मुळा, भंडारदरा धरण २५ टक्के भरले

By Admin | Published: July 10, 2016 12:32 AM2016-07-10T00:32:17+5:302016-07-10T00:36:26+5:30

राहुरी/राजूर/ अकोले : भंडारदरा, मुळा धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने दोन्ही धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.

Mulla, Bhandardara Dam 25 percent filled | मुळा, भंडारदरा धरण २५ टक्के भरले

मुळा, भंडारदरा धरण २५ टक्के भरले

राहुरी/राजूर/ अकोले : भंडारदरा, मुळा धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने दोन्ही धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या मुळा धरणात शनिवारी दुपारी ६ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे़ सायंकाळीही ३० हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने धरण २५ टक्के भरले. तर भंडारदरा धरणानेही २५ टक्क्यांचा टप्प्पा ओलांडला आहे.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नव्हती़ जुलै महिन्यात काही प्रमाणावर पावसाने हजेरी लावली़ शनिवारी पाणलोट क्षेत्रावर पावसाची कृपा झाल्याने दुपारी ३ वाजता धरणात ११ हजार १५५ क्यूसेक पाण्याची आवक झाली आहे़ तर सायंकाळी ६ वाजता हाच आकडा ३० हजार क्यूसेकपर्यंत गेला होता. त्यामुळे पाणीसाठा २५ टक्क्यांचा टप्पा पूर्ण करणार आहे़ मुळा धरणावर नजिकच्या काळात दमदार पावसाची अपेक्षा आहे़ गेल्या तीन वर्षांपासून धरण न भरल्याने शेतीचे गणित बदलले आहे़ यंदा धरण भरले तर ऊस शेतीचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष धरणाच्या पाणीपातळीकडे लागले आहे़

Web Title: Mulla, Bhandardara Dam 25 percent filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.