निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट

By सुदाम देशमुख | Published: March 29, 2024 09:14 AM2024-03-29T09:14:55+5:302024-03-29T09:16:19+5:30

आज दुपारपर्यंत ते विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले

NCP Ajit Pawar faction MLA Nilesh Lanke to resign today will join Sharad Pawar party | निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट

निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट

अहमदनगर:  पारनेरचे आमदार निलेश लंके आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राजीनाम्यामुळे ते अहमदनगर लोकसभा मतारसंघांची निवडणूक महाविकास आघाडीकडून लढणार हे निश्चित होणार आहे.

दोन आठवड्यांपूर्वी लंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपण त्यांच्या विचाराचे असल्याचे सांगितले होते. शरद पवार गटाकडून लंके हे अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचेही संकेतही मिळत होते. लंके या मतदारसंघात अनेक दिवसांपासून सक्रियही आहेत. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाची व उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पक्षांतर बंदी कायद्याची बाधा येऊ शकते त्यामुळे लंके यांनी मौन बाळगले होते. मात्र आता ते राजीनामा देऊन अधिकृतपणे रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. आज दुपारपर्यंत ते विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: NCP Ajit Pawar faction MLA Nilesh Lanke to resign today will join Sharad Pawar party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.