श्रीगोंद्यात एकाच रात्री सहा घरफोड्या
By Admin | Published: May 4, 2017 01:34 PM2017-05-04T13:34:16+5:302017-05-04T13:34:16+5:30
लोणीव्यंकनाथ शिवारात बुधवारी रात्री दरोडेखोराने धुमाकूळ घालत सहा घरे फोडली. दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात पाच जखमी झाले असून पार्वतीबाई शंकर शिंदे गंभीर जखमी झाल्या आहेत.
श्रीगोंदा (अहमदनगर) : लोणीव्यंकनाथ शिवारात बुधवारी रात्री दरोडेखोराने धुमाकूळ घालत सहा घरे फोडली. दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात पाच जखमी झाले असून पार्वतीबाई शंकर शिंदे गंभीर जखमी झाल्या आहेत.घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले असून तपासासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात येणार आहे.
बुधवारी रात्री सुरूवातीला पोपट आरेकर यांची चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर रानमळ्यात दादा काकडे यांचा वैरण तोडण्याचा कोयता घेतला. त्यानंतर शंकर शिंदे यांच्या घरी जावून पार्वतीबाई शिंदे व गणेश शिंदे या मायलेकरावर हल्ला केला. पार्वतीबाई यांच्या डोक्यात कोयता मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. यानंतर सयाजी काकडे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सुरेश मडके यांच्या घराचे कुलूप तोडले घरावर झोपलेल्या शालनबाई मडके व महेश मडके या मायलेकरांना मारहाण केली सुमारे अर्धा तोळे सोन्याचे दागिने त्यानी काढून नेले.काशीनाथ जाधव व मंगल या घराबाहेर झोपलेल्या पती पत्नीस मारहाण केली व अर्धा कानातील सोन्याचे फुले काढून घेताना मंगलबाई यांचा एक कान तुटला.त्यानंतर बापू काळाणे यांच्या घरात प्रवेश केला ३० हजाराची रोकड लंपास केली.यासाठी दरोडेखोरानी सोने व पैशाची लिंबोणीच्या बागेत वाटणी करून घेतली.