२५0 एकरांवरील मशागत ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:30 AM2017-08-21T01:30:36+5:302017-08-21T01:31:49+5:30
अंदुरा : येथील शेतशिवारातील शिंगोली व बाळापूर शेतरस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतरस्त्यालगतच्या २५0 एकरांवरील शेतजमिनीची मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे, परिसरातील शेतकर्यांची पिके धोक्यात आली असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावर्षी सुरुवातीला मृग नक्षत्रात परिसरातील शेतकर्यांनी पेरणी आटोपली होती; परंतु मोक्याच्या क्षणी पुन्हा पावसाने दडी मारल्याने परिसरातील पेरण्या उलटल्या. त्या अनुषंगाने कर्ज, उसनवारी, व्याजाने पैसे काढून शेतकर्यांनी दुबार पेरण्या केल्या.
त्यावेळी काही प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या शेतातील पिके बहरायला लागली. अशावेळी मशागतीची लगबग सुरू होताच परिसरातील शिंगोली शेतरस्ता व बाळापूर शेतरस्ता पाणखास नाल्याजवळ अत्यंत दयनीय अवस्था झाली. संपूर्ण रस्ता चिखलमय होऊन या रस्त्याने माणसाला जाता येत नाही. शेतकर्यांना सुमारे ६ ते ८ किमी अंतरावरून जाऊन आपल्या शेती मशागतीचे कामे करवून घ्यावे लागते. या शेतकर्यांच्या विकट अवस्थेकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकर्यांच्यावतीने करण्यात आली आहे.
पाणखास नाल्यावर पूल बांधण्याची मागणी
अंदुरा शेतशिवारातून वाहणार्या पाणखास नाल्याला दरवर्षी पूर येतो. त्यामुळे परिसरातील बाळापूर शेतरस्ता व शिगोली शेतरस्ता पूर्णपणे चिखलमय होतो. त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांना मशागतीसाठी अडथळा होतो. त्यामुळे येथे पूल बांधून शेतकर्यांची शेतरस्त्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.
या शेतरस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याने चालणेसुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळे शेती मशागतीचे कामे खोळंबल्याने शेतातील उत्पादन यावर्षी घटणार आहे.
-सुरज बेंडे, शेतकरी अंदुरा