५८ गुरांची कोंबून वाहतूक करणारा ट्रक पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:39 AM2017-10-14T01:39:42+5:302017-10-14T01:40:06+5:30

मूर्तिजापूर शहरातील गुल्हाने मंगल कार्यालयाच्या पाठीमागे १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास एका ट्रकातून गुरे उतरविण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीवरून ठाणेदार पडघन यांनी धाड टाकून ट्रकसह गुरे ताब्यात घेतली.

58 trucks carrying junket truck caught! | ५८ गुरांची कोंबून वाहतूक करणारा ट्रक पकडला!

५८ गुरांची कोंबून वाहतूक करणारा ट्रक पकडला!

Next
ठळक मुद्देदोन गुरांचा मृत्यू ट्रकचालक फरार 

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर शहरातील गुल्हाने मंगल कार्यालयाच्या पाठीमागे १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास एका ट्रकातून गुरे उतरविण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीवरून ठाणेदार पडघन यांनी धाड टाकून ट्रकसह गुरे ताब्यात घेतली. पोलिसांना पाहताच ट्रकचालकासह इतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. सदर गुरे कोठून आणि कुणाकडे आणण्यात आली होती, याबाबत सखोल तपास मूर्तिजापूरचे ठाणेदार करीत आहेत.
येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ११ गुरे पकडली होती. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास जुन्या शहरातील गुल्हाने मंगल कार्यालयाच्या मागे अवैधरीत्या गुरे भरून आणलेल्या ट्रकातून गुरांना उतरविण्यात येत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन पडघन, पोहेकॉं. गणेश पांडे, पोकॉं. दीपक तायडे, गोलंदाज लांजेवार, नीलेश खंडारे, अमोल वाहेकर, मोईन खान, चालक नंदकिशोर दीपकवार यांनी कारवाई करून एमपी 0९ एचजी ३२९९ क्रमांकाचा ट्रक पकडला. सदर ट्रकमध्ये ५८ गुरे अक्षरश: कोंबून आणण्यात आली होती. 
यापैकी दोन गुरांचा मृत्यू झाला होता. इतर गुरांची स्थिती पाहवली जात नव्हती. ठाणेदारांनी या गुरांवर वैद्यकीय उपचार करण्याकरिता डॉक्टरांची मदत घेतली.  पोलिसांना मिळालेल्या कागदपत्रानुसार सदर ट्रक इंदोरवरून आला असल्याचे दिसून येत आहे; परंतु तपासानंतर खरी परिस्थिती समजणार आहे. सदर गुरे पुंडलीक महाराज गोरक्षणाचे अँड. पांडे, विशाल गुप्ता, धीरज मोकाशे यांच्या उपस्थितीत गोरक्षणच्या सुपूर्द करण्यात आली. 

Web Title: 58 trucks carrying junket truck caught!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा