दहीहांडा येथील पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता
By admin | Published: August 9, 2014 01:52 AM2014-08-09T01:52:38+5:302014-08-09T02:05:01+5:30
अकोला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभेत १ कोटींची योजनेस प्रशासकीय मान्यता.
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दहीहांडा येथील १ कोटी ७ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत शुक्रवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत दहिहांडा येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने, येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकर्यांच्या शेतात बोअर करण्यासाठी भूजल पातळी तपासणीची यंत्रणा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे उपलब्ध आहे का, याबाबत समिती सदस्य गोपाल कोल्हे यांनी सभेत विचारणा केली असता, पाणीस्रोत, पाणी पातळी व पाण्यातील घटक तपासणीबाबत यंत्रणा उपलब्ध आहे; मात्र ह्यड्रायझोनह्ण क्षेत्रात बोअरकरिता प्रमाणपत्र देता येणार नसून, विहिरींसाठी प्रमाणपत्र दिले जाते, अशी माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या संबंधित अधिकार्यांनी सभेत दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, राधिका धाबेकर, पार्वती वाहोकार, समितीचे सदस्य गोपाल कोल्हे, गजानन गावंडे, राजेश खोने, सरला मेश्राम यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बचुटे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार, लघुसिंचन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता डी.एन.मडावी उपस्थित होते.