अकोला : ‘एटीपी’ केंद्र लुटणार्या आरोपींकडून ४.७५ लाखांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:35 AM2017-12-30T01:35:16+5:302017-12-30T01:35:58+5:30
अकोला : दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्रात दरोडा घालून ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड लुटून नेणार्या तिघा आरोपींना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी आरोपींकडून लुटीतील ४ लाख ७५ हजार रुपयांची रोकड जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्रामध्ये दरोडा घालून इलेक्ट्रिशियन संतोष राजाराम भटकर (३२), वसंत नारायण महाराज आणि काले खान महेमुद खान यांनी सुरक्षा रक्षक सुधीर मधुकर लाळे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर आरोपींनी एटीपी मशीनमधील ५ लाख ६0 रुपयांची रोकड लुटून नेली. २२ डिसेंबर रोजी पहाटे पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
तिघेही आरोपी शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने, पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.