अकोला : जळालेल्या ‘त्या’ महिलेचा खूनच; मृतक महिला यवतमाळची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:17 AM2017-12-28T02:17:49+5:302017-12-28T02:20:25+5:30

अकोला - रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, तो खरा ठरला आहे. सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, ही महिला यवतमाळ येथील असल्याचे समोर आले आहे.

Akola: The blood of the 'burnt' woman; Mother of the deceased Yavatmal! | अकोला : जळालेल्या ‘त्या’ महिलेचा खूनच; मृतक महिला यवतमाळची!

अकोला : जळालेल्या ‘त्या’ महिलेचा खूनच; मृतक महिला यवतमाळची!

Next
ठळक मुद्देअज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला - रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, तो खरा ठरला आहे. सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, ही महिला यवतमाळ येथील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी यवतमाळ आणि अकोल्यातील अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यवतमाळ येथील वैभव नगर राजगुरू अपार्टमेंटमधील रहिवासी   सुमन रामभाऊ लक्षणे (वय ६0) अशी या महिलेची ओळख असून, ही महिला १७ डिसेंबरपासून बेपत्ता होती. या महिलेची हत्या करून अज्ञात आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा देह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.
महिलेच्या जळालेला मृतदेहाच्या प्रकरणात रामदास पेठ पोलीस सर्वच दिशांनी तपास करीत असतानाच यवतमाळ येथील  वाघापूर वैभव नगर राजगुरू अपार्टमेंटमधील रघुनाथ रामभाऊ लक्षणे यांनी आई बेपत्ता असल्याची तक्रार यवतमाळ येथे दाखल केली आहे.  या  तक्रारीमुळे  अकोल्यात आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाला तोंड फुटले आहे. 


 रघुनाथ लक्षणे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की ते आपली  पत्नी तसेच मुलासोबत वेगळे राहत होते. त्यांची आई  सुमन रामभाऊ लक्षणे, भाची  पायल मनोज तोंडसे व पत्नीच्या बहिणीची मुलगी प्रियंका पटेल यांच्यासोबत यवतमाळ येथील संकट मोचन रोडवरील नवीन उमरसरा येथे राहतात. १६ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता रघुनाथ आईला भेटून घरी आला होते.
 दरम्यान, १८ डिसेंबर रोजी त्याची भाची पायलने फोन करून  सुमनबाई या १७ डिसेंबरच्या दुपारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या त्या परत आल्या  नाहीत, अशी माहिती दिली. या नंतर सर्वांनी सुमनबाईंचा शोध घेतला. 
नातेवाईकांकडेही शोध घेतल्यावर तिचा शोध न लागल्याने अखेर  वडगाव पोलीस स्टेशनमध्ये सुमनबाई  बेपत्ता झाल्याची तक्रारी दाखल करण्यात आली. या दरम्यान यवतमाळचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर हे तपास करीत असताना त्यांना अकोला येथे महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी रघुनाथ  यांना फोन करून, या संदर्भात माहिती दिली. 
सदर मृतदेह हा सुमनबाईंचा तर नाही ना? या संशयावरून त्यांनी अकोला गाठले. पीएसआय  संतोष मनवर व पोलिस कर्मचार्‍यांच्यासोबत रघुनाथ अकोल्यात आले. 
रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची माहिती घेतली असता सदर महिला सुमनबाई असल्याची ओळख पटली  आहे. 
 यावरून रघुनाथ यांनी रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भादंवी कलम ३0२, २0१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या  प्रकरणात आरोपी हे यवतमाळमधील असल्याची शक्यता असून त्यांना अकोल्यातील कोणाची मदत मिळाली या दृष्टीने तपास केला जात आहे.

सखोल तपासानंतर उलगडणार हत्येचे गूढ 
या महिलेला कोठे जाळण्यात आले, अकोल्यातील दगडी पुलाखाली कुणी आणले, यामध्ये कोण-कोण सहभागी आहे, हत्येचा उद्देश काय? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

Web Title: Akola: The blood of the 'burnt' woman; Mother of the deceased Yavatmal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.