अकोला जिल्हा दूध उत्पादक संघाचा भार अशासकीय सदस्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:34 PM2018-01-10T13:34:51+5:302018-01-10T13:36:32+5:30
अकोला : जिल्हा दूध उत्पादक संघाचा कारभार अशासकीय सदस्यांकडे सोपविण्यात आला असून, दूध संघाच्या निवडणुकीपर्यंत प्राधिकृत अधिकारी समिती अशासकीय सदस्य कार्यरत असतील.
अकोला : जिल्हा दूध उत्पादक संघाचा कारभार अशासकीय सदस्यांकडे सोपविण्यात आला असून, दूध संघाच्या निवडणुकीपर्यंत प्राधिकृत अधिकारी समिती अशासकीय सदस्य कार्यरत असतील. हा कार्यकाळ चार महिने राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामध्ये शिवा मोहोड प्रमुख अशासकीय सदस्य आहेत.
प्राधिकरण निवडणूक पुणे यांच्या मार्गदर्शनानंतर २०१७ ते २०२२ पर्यंत संघाच्या १२ संचालक पदांसाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली होती. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पुरविणे व स्वीकृत करण्याची अंतिम मुदत होती. तथापि, संघाच्या एकाही सदस्याने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे सहायक निवडणूक अधिकारी आर.आर. घोडके यांनी ही निवडणूक रद्द केली. त्याअगोदरही जिल्हा उत्पादक संघाचा प्रभार प्रशासकाकडे होता.
दरम्यान, प्राधिकृत अशासकीय सदस्यांमध्ये शिवा मोहोड, संदीप लोड, सतीश हांडे, अनिरुद्ध देशपांडे, संतोष साबळे, जयेश भोसे, सचिन बोनगुरे, श्रीराम ताले, प्रणय बासोडे यांचा समावेश आहे.