अकोल्यात शिवसेना जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:12 AM2017-12-07T02:12:59+5:302017-12-07T02:13:54+5:30
अकोला : रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही पैसे मिळत नसल्यामुळे शाखा अभियंता किशोर राऊत यांनी कंत्राटदाराचे देयक थांबविल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व कंत्राटदाराने शाखा अभियंता राऊत यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी राऊत यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह कंत्राटदारावर शासकीय कामात अडथळा आणणे व मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषदेचे शासकीय कंत्राटदार अक्षय कुलकर्णी यांनी गत तीन महिन्यांपूर्वी एका रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने देयक शाखा अभियंता किशोर राऊत यांच्याकडे सादर केले. त्यानंतर वारंवार पाठ पुरावा केला; मात्र शाखा अभियंता राऊत यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकारामुळे कंत्राटदार कुलकर्णी हतबल झाल्यानंतर त्यांनी हा प्रकार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना सांगितले. त्यानंतर जिल्हाप्रमुख देशमुख हे कंत्राटदाराला सोबत घेऊन शाखा अभियंता किशोर राऊत यांच्या दालनामध्ये गेले. यावेळी त्यांना देयकाबाबत विचारणा केली असता, राऊत यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने देशमुख यांचा पारा चढला. शाखा अभियंता व जिल्हाप्रमुख यांच्यात शाब्दीक वाद झाल्यानंतर जिल्हाप्रमुख देशमुख यांच्याशी मग्रुर भाषेत संवाद साधणार्या राऊत यांच्यावर शिवसैनिकांनी हात उगारला. या घटनेनंतर शाखा अभियंता राऊत यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, कंत्राटदार अक्षय कुलकर्णी यांच्या विरोधात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध ३५३,३३२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.