अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या आरोपीस तीन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 09:47 PM2018-01-23T21:47:31+5:302018-01-23T21:56:40+5:30
उरळ (अकोला): पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कळंबी महागाव ये थील अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात प्रवेश करून विनयभंग करणार्या आरो पीस अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने २३ जानेवारी रोजी तीन वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उरळ (अकोला): पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कळंबी महागाव येथील अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात प्रवेश करून विनयभंग करणार्या आरो पीस अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने २३ जानेवारी रोजी तीन वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
कळंबी महागाव येथील अल्पवयी मुलगी घरात एकटी असताना गावातील रामराव पांडुरंग सावळे याने पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्या घरात प्रवेश केला. तसेच तिचा विनयभंग केला होता. ही घटना ७ मे २0१६ रोजी घडली होती. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी रामराव सावळे विरुद्ध कलम ३५४, ४५२, बालकांचा लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उ पनिरीक्षक आर.के.साठवणे, जमादार श्रीकृ ष्ण डांगे, पोना गणेश गावंडे यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले हेाते. अकोला जिल्हा सत्र न्यायलयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून रामराव सावळे यास दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला.