अकोला मनपा आयुक्त सरसावले; अतिक्रमणावर हतोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:01 AM2018-01-17T02:01:29+5:302018-01-17T02:01:58+5:30
अकोला : शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने मलकापूर शेतशिवारात मंजूर नकाशाव्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकाम केले होते. सदर बांधकामावर महापालिका प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा बांधकामाला सुरुवात केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या प्रकरणाची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या आदेशानुसार मंगळवारी नगररचना विभागाने त्या इमारतीचा अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्याची कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर शेतशिवारातील व्हीएचबी कॉलनीसमोर शहरातील व्यावसायिकाने भूखंड क्रमांक २६, २७, २८ व २९ येथील जागेवर बांधकाम सुरू केले होते. सदर बांधकाम मंजूर नकाशाव्यतिरिक्त जास्त असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर नगररचना विभागाच्यावतीने इमारतीवर कारवाई करण्यात आली होती. तसेच उर्वरित अनधिकृत बांधकाम सदर व्यावसायिकाने स्वत: तोडावे अशी सूचना प्रशासनाने केली होती. मात्र या बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम न पाडता काही कालावधीनंतर पुन्हा बांधकामाला सुरुवात केली. हा प्रकार महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या समोर येताच त्यांनी सदर इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले. त्यानुषंगाने नगररचना विभागाने जेसीबीच्या मदतीने इमारतीचा अनधिकृत भाग तोडण्याची कारवाई करीत बांधकाम व्यावसायिकाला तंबी दिल्याची माहिती आहे.