अकोला : म्हैसांग-अकोला मार्गावर वाळूचा अवैध उपसा करणारे सहा ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:54 PM2017-12-19T22:54:57+5:302017-12-19T22:57:18+5:30

अकोला : म्हैसांग ते अकोला या मार्गावर वाळूचा अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करणार्‍या चार ट्रक व दोन ट्रॅक्टरवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी घुसर ते अकोट फैलदरम्यान पाळत ठेवून कारवाई केली.

Akola: Six trucks carrying illegal sand bars on the Mysang-Akola route were seized | अकोला : म्हैसांग-अकोला मार्गावर वाळूचा अवैध उपसा करणारे सहा ट्रक जप्त

अकोला : म्हैसांग-अकोला मार्गावर वाळूचा अवैध उपसा करणारे सहा ट्रक जप्त

Next
ठळक मुद्देचोरीचा गुन्हा दाखलविशेष पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : म्हैसांग ते अकोला या मार्गावर वाळूचा अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करणार्‍या चार ट्रक व दोन ट्रॅक्टरवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी घुसर ते अकोट फैलदरम्यान पाळत ठेवून कारवाई केली. ही सहा वाहने जप्त केली असून, तब्बल २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोठी उमरी येथील रहिवासी मनीष गिरी, सतीश सुळे, गणेश गंगागीर गिरी यांच्या मालकीच्या एमएच ३0 एबी ९६0२ आणि एमएच ३0 एएन ९७४९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने योगेश नागोराव बोपटे रा. आपातापा व प्रकाश चिंतामण वानखडे हे दोघे ट्रॅक्टरचालक वाळूची चोरी करून ती अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी दोन्ही ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेतले, तसेच दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले असून, सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर लहान उमरीतील रहिवासी सुभाष गावंडे याच्या मालकीच्या एमएच ३0 एल ४८७२ क्रमांकाच्या ट्रकने हबीब शाह अकबर शाह मदारी, अमीन लोदी याच्या मालकीच्या एमएच ३0 एबी १0५८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरत चंद्रकांत नाचरू आणि पाचमोरीतील रहिवासी आरीफ भाई याच्या एमएच ३४ ए ६९१८ क्रमांकाच्या तसेच एमएच व्ही ७३७७ क्रमांकाच्या ट्रकमधून प्रमोद अशोक वदे आणि दीपक मंगल बदराशे हे वाळूची अवैधरीत्या उपसा करून चोरी करीत असल्याचे अळसपुरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पथकासह घुसर ते अकोट फैलदरम्यान पाळत ठेवून चार ट्रक आणि ट्रॅक्टर जप्त केला. तब्बल २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सदर आरोपींविरुद्ध कलम ३७९, २८७ नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व पथकाने केली. या प्रकरणातील १३ पैकी ७ आरोपींना  अटक करण्यात आली आहे.

Web Title: Akola: Six trucks carrying illegal sand bars on the Mysang-Akola route were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.