अकोला : वेतनवाढीसाठी एसटी कामगार संघटनेचे आंदोलन; कर्मचार्‍यांनी केली अहवालाची होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 10:00 PM2018-01-25T22:00:40+5:302018-01-25T22:04:29+5:30

अकोला : वेतनवाढसह प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले. उच्चस्तरीय आयोग समितीने दिलेल्या अहवालाची होळी करीत राज्यभरात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. अकोला आगार क्रमांक एकवर ही होळी करून कर्मचार्‍यांनी या राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदविला.

Akola: ST Workers' Association Movement to Increase; Staff said the report of Holi! | अकोला : वेतनवाढीसाठी एसटी कामगार संघटनेचे आंदोलन; कर्मचार्‍यांनी केली अहवालाची होळी!

अकोला : वेतनवाढीसाठी एसटी कामगार संघटनेचे आंदोलन; कर्मचार्‍यांनी केली अहवालाची होळी!

Next
ठळक मुद्देआगार क्रमांक एकमध्ये केली उच्चस्तरीय आयोग समितीने दिलेल्या अहवालाची होळीअकोल्यातील कर्मचार्‍यांनी नोंदविला राज्यव्यापी आंदोलनात सहभाग 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वेतनवाढसह प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले. उच्चस्तरीय आयोग समितीने दिलेल्या अहवालाची होळी करीत राज्यभरात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. अकोला आगार क्रमांक एकवर ही होळी करून कर्मचार्‍यांनी या राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदविला.
 वेतनवाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी दिवाळीच्या वेळी सलग चार दिवस कर्मचार्‍यांनी चक्का जाम आंदोलन केले होते. त्यावेळी शासनाने मध्यस्थी करून उच्चस्तरीय समिती गठित केली. उच्चस्तरीय समितीने प्रस्तावित केलेले मुद्दे संघटनेने फेटाळून लावले. दरम्यान, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले. शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची होळी २५ जानेवारी रोजी करण्याचा इशारा दिला गेला. २५ जानेवारीपर्यंतही कोणतीही दखल न घेतल्या गेल्याने अखेर एसटी कामगार संघटनेच्या वतीने गुरुवारी राज्यभरात हे आंदोलन केले गेले.  अकोला विभागाच्या वतीने अकोला आगार क्रमांक एकमध्ये अहवालाची होळी करण्यात आली. अविनाश जहागिरदार, अनिल गरड आणि देवानंद पाठक यांच्या नेतृत्वात छेडण्यात आलेल्या या आंदोलनात अकोला आगार डेपोचे अध्यक्ष राजीक देशमुख, सचिन हाताळकर, सईदखान ईर्शाद अहमद, रहीमभाई, देशमुख, महेंद्र राठोड, शोभा गोंड, के.बी. पाटील, एम.एस. शेख, हसन मोहम्मद, दिनोदिया गोरे, ए.आर. राठोड, एस.एस. कात्रे, एस. डी. मेतकर आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Akola: ST Workers' Association Movement to Increase; Staff said the report of Holi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.