अकोला : शिवर येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:44 AM2018-01-02T01:44:36+5:302018-01-02T01:44:51+5:30
अकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाला. या युवकाच्या मृत्यूचे कारण समोर आले नसले, तरी त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाला. या युवकाच्या मृत्यूचे कारण समोर आले नसले, तरी त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शिवर येथील रहिवासी गणेश अशोक सुरतकर (३0) हा रविवारी सकाळपासून दारूच्या नशेत होता. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फिरत असताना रात्रीच्यादरम्यान बसस्थानक पोलीस चौकीतील एका पोलीस कर्मचार्याने त्याला पोलीस चौकीत बसवून ठेवले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. गणेश सुरतकरची पत्नी दुर्गा व शेजारी राहणारे उमेश निकम पाटील हे बसस्थानक पोलीस चौकीत सुरतकर यांना घेण्यासाठी आले. चौकीतील पोलीस कर्मचारी दाते यांनी नांेद घेऊन गणेश सुरतकर यांना ताब्यात दिल्याची माहिती सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात सांगितली. तसेच ही नोंद पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत घेण्यात आली. रात्री गणेश सुरतकर, त्यांची पत्नी व शेजारी घरी परतल्यानंतर सोमवारी पहाटे गणेश सुरतकर यांचा मृत्यू झाला. सुरतकर यांचा मृत्यू झाल्याचे बसस्थानक पोलीस चौकीतील कर्मचार्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, बसस्थानक परिसरातील एका अंड्याच्या गाडीवर गणेश सुरतकर यांना मारहाण झाल्याचे समोर आले आहे. सिव्हिल लाइन पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या मृत्यूचा तपास पोलीस निरीक्षक अन्वर शेख करीत आहेत.