अकोला जिल्हा परिषद; शिक्षण सभापतींचा स्वीय सहायक ‘एसीबीच्या जाळ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 04:59 PM2017-12-21T16:59:13+5:302017-12-21T17:50:40+5:30

अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापत पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला गुरुवारी दुपारी एका तक्रारकर्त्याकडून ५००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)अधिकाºयांनी रंगेहाथ अटक केली.

Akola Zilla Parishad;Acb trap employee taking bribe | अकोला जिल्हा परिषद; शिक्षण सभापतींचा स्वीय सहायक ‘एसीबीच्या जाळ्यात’

अकोला जिल्हा परिषद; शिक्षण सभापतींचा स्वीय सहायक ‘एसीबीच्या जाळ्यात’

Next
ठळक मुद्देपाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ केले अटक.माहीती न देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे दर महिन्याला ५००० रुपये देण्याची मागणी केली होती.


अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापत पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला गुरुवारी दुपारी एका तक्रारकर्त्याकडून ५००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)अधिकाºयांनी रंगेहाथ अटक केली. जिल्हा परिषद परिसरात दुपारच्या सुमारास सापळा लावून लाचखोर श्रीकांत ठाकरेच्या मुसक्या आवळण्यात आल्याच्या कारवाईने एकच खळबळ उडाली.
शिक्षण सभापती यांचा स्वीय सहायक असलेला श्रीकांत ठाकरे हा जिल्हा परिषदेच्या शाळांना होणाºया पोषण आहारात खंड पडल्याबाबतची माहिती विचारून तक्रारकर्त्यास त्रास देत होता. शिक्षण विभागाच्या बैठकीतही ठाकरे हा मुद्दा वारंवार उपस्थित करून तक्रारदारास त्रास देत होता. पोषण आहारात खंड का पडला, याबाबतची माहीती द्यायची नसेल, तर त्या मोबदल्यात दर महिन्याला ५००० रुपये द्या, अशी मागणी श्रीकांत ठाकरे तक्रारदाराकडे करत होता. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे श्रीकांत ठाकरेची तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून ‘एसीबी’चे पोलिस अधिक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात गुरुवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास सापळा रचण्यात आला. यावेळी श्रीकांत ठाकरे याला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. आरोपीकडून ५००० रुपये जप्त करण्यात आले. ‘एसीबी’चे पोलिस अधिक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक इश्वर चव्हाण, सैरिशे, सुनिल, संतोष, प्रविण यांनी ही कारवाई केली.

जिल्हा परिषदेतील दुसरा सापळा
जिल्हा परिषदेतील हा दुसरा यशस्वी सापळा ठरला आहे. याआधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका कर्मचाºयास लाच घेताना अटक करण्यात आली होती.

Web Title: Akola Zilla Parishad;Acb trap employee taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.