ऑटोरिक्षा चालकांच्या बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल!

By admin | Published: January 22, 2017 03:09 AM2017-01-22T03:09:28+5:302017-01-22T03:09:28+5:30

शुल्कवाढ मागे घेण्यासाठी दिले धरणे.

Autorickshaw drivers shutdown on common citizens! | ऑटोरिक्षा चालकांच्या बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल!

ऑटोरिक्षा चालकांच्या बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल!

Next

अकोला, दि. २१- ऑटोरिक्षा चालकांनी शनिवारी छेडलेल्या आंदोलनात्मक पवित्र्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांचे प्रचंड हाल झाले. शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यापासून ते घरातून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला ऑटोचालकांच्या आकस्मात आंदोलनाचा फटका बसला.
शनिवार हा दिवस अकोलेकरांना प्रचंड अडचणीचा ठरला. चिल्ल्या-पिल्ल्यांना शाळेत घेऊन जाणारा ऑटोवाला न आल्याने, मुलांना शाळेत सोडण्यापासून ते त्यांना घरी आणण्यापर्यंतची कसरत पालकांना करावी लागली.
अनेक चाकरमान्यांनी तर मुलांना शाळेत न पाठविण्याचा मार्ग निवडला. तर अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शाळेत उशिरा पोहोचलेल्या पालकांना, बंद झालेल्या प्रवेशद्वारापासून माघारी फिरावे लागले. घराबाहेर पडणार्‍या प्रत्येक चाकरमान्याला ऑटोचालकांच्या बंदचा फटका बसला.
घरगुती कामकाजानिमित्त किंवा दैनंदिन कामासाठी परगावी निघालेल्यांचीसुद्धा रेल्वे आणि बसस्थानक गाठताना दमछाक झाली. ऑटोरिक्षा उपलब्ध नसल्यामुळे परगावाहून आलेल्यांनासुद्धा घरापर्यंत रपेट करावी लागली.
मुख्य बाजारपेठेतून दररोज भाजी, दूध व अन्य साहित्य विक्रीसाठी घेऊन जाणार्‍यांनी मालवाहू छकडेवाल्यांची मदत घेतली. ऑटो उपलब्ध नसल्यामुळे शहरातील रस्त्यांवर दिवसभर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचीच गर्दी दिसून आली. या बंदमुळे सर्वात जास्त विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना पायी घरी जावे लागले.

Web Title: Autorickshaw drivers shutdown on common citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.