बाळापूर : सात लाखांच्या खंडणीसाठी तीन दिवस डांबून ठेवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:47 AM2018-01-11T01:47:30+5:302018-01-11T01:47:53+5:30

बाळापूर : अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडर्य़ाचे शे. अकील शे. रफीक (५0 ) यांना बाळापूरमधून  जबरदस्तीने  पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले. त्यांच्याच मोबाइलवरून त्यांच्या मुलाच्या मोबाइलवर कॉल करून  सात लाख रुपयांची खंडणी मागितली.

Balapur: For seven lakhs ransom, it is for three days! | बाळापूर : सात लाखांच्या खंडणीसाठी तीन दिवस डांबून ठेवले!

बाळापूर : सात लाखांच्या खंडणीसाठी तीन दिवस डांबून ठेवले!

Next
ठळक मुद्देबाळापुरातून केले अपहरण : एकास अटक, तिघे पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडर्य़ाचे शे. अकील शे. रफीक (५0 ) यांना बाळापूरमधून  जबरदस्तीने  पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले. त्यांच्याच मोबाइलवरून त्यांच्या मुलाच्या मोबाइलवर कॉल करून  सात लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास  जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शे.फैद्दान शे.अकील यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शे.अकील यांची सुटका केली; तसेच कार जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे.   
साखरखेर्डा येथील  शे. अकील शे.  रफीक हे अकोला  येथून साखरखेर्डा येथे परत जात असताना  ६ जानेवारी  रोजी  दुपारी  १ वाजता  एम. एच. ३0 ए. एफ. ८१0६ क्रमांकाच्या कारमधून  शे. युनूसखा  जब्बारखा  सिंधी कॅम्प रा. अकोला व इतर तिघे बाळापुरात आले. तेथे त्यांनी शे.अकील यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले. त्यांना ९ जानेवारीपर्यंत  काटेपूर्णा येथील झोपडपट्टीत डांबून ठेवले. त्यानंतर शे. अकील यांच्या मोबाइलवरून शे.फैद्दान शे. अकील यांना कॉल करून आरोपींनी त्यांना सात लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. सदर रक्कम न दिल्यास  शे.अकील यांना जीवे मारण्याची  धमकी दिली. या  अपहरणकर्त्यांविरोधात  शे. फैद्दान शे. अकील यांनी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये ९ जानेवारी रोजी रीतसर फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी ९ जानेवारीच्या रात्रीच काटेपूर्णा येथे जाऊन शे. अकील शे रफीक यांना अपहरणकर्त्यांच्या  ताब्यातून सोडविले. याप्रकरणी आरोपी  शे. युनूसखा जब्बारखा याला ताब्यात घेतले, तसेच अपहरणासाठी वापरलेली कार जप्त केली. दरम्यान, या अपहरण व खंडणी प्रकरणातील अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत. 
पुढील तपास  ठाणेदार  विनोद  ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक  वाघमोडे,  हे.काँ. शुद्धोधन इंगळे, हे. काँ. जोशी  करीत आहेत.

आरोपीला पोलीस कोठडी
- बाळापूर पोलिसांनी आरोपी युनूसखा जब्बारखा व अन्य अनोळखी तीन  आरोपींविरुद्ध भादंविच्या ३६४(अ), ३६३,३८६ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 
- सदर आरोपीस बाळापूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

Web Title: Balapur: For seven lakhs ransom, it is for three days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.