छावा संघटनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 08:32 PM2017-11-07T20:32:42+5:302017-11-07T20:34:06+5:30
अडगाव (शिवाजीनगर) : अकोट व तेल्हारा तालुक्यातील रस् त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी छावा संघटनेच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अडगाव (शिवाजीनगर) : अकोट व तेल्हारा तालुक्यातील रस् त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी छावा संघटनेच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी भीक मांगो आंदोलन करण्यात आले. भीक मागून गोळा झालेल्या पैशातून या रस्त्यांची दुरुस्ती करावी,अशी मागणी यावेळी छावा संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
अकोट-अकोला,अकोट-तेल्हारा मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अपघात घडत आहेत. अनेक निवेदने देऊनही रस्त्यांची दुरुस्ती न केल्याने छावा संघटनेच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. या भिकेतून जमा झालेल्या पैशातून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून, मागणी मान्य न झाल्यास यानंतर होणार्या अपघाताची जबाबदारी निश्चित करून संबंधित रस् त्याच्या अभियंत्यावर कारवाई करावी, अन्यथा छावा संघटना आंदोलन करेल, असा इशारा उपमुख्य कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग,अकोट दिलेल्या निवेदनात देण्यात आला. सदर निवेदन जिल्हाप्रमुख डॉ.शंकरराव वाकोडे यांच्या आदेशावरून देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख नवृत्ती वानखडे, जिल्हा सचिव प्रवीण बानेरकर, जिल्हा संघटक परिक्षित बोचे,तालुका प्रमुख तेल्हारा डॉ.श्याम कोल्हे, संतोष भगत, ज्ञानेश्वर मानकर, स्वप्निल कोल्हे, विशाल मानकर, गणेश साबळे, शुभम नांदुरकर, सोपान मानकर, नंदु दहीकर, किशोर साबळे, गणेश दहीकर, सुरेश गवई आदींची स्वाक्षरी आहे.