भाजप नव्हे "भारतीय गाजर पार्टी" - नितीन बानगुडे पाटील

By admin | Published: February 14, 2017 06:19 PM2017-02-14T18:19:35+5:302017-02-14T18:19:35+5:30

केंद्रासह राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाने अडीच वर्षांच्या कार्यकाळात जनतेची केवळ दिशाभूल करण्याचे काम केले

BJP is not "Indian carrot party" - Nitin Bangguide Patil | भाजप नव्हे "भारतीय गाजर पार्टी" - नितीन बानगुडे पाटील

भाजप नव्हे "भारतीय गाजर पार्टी" - नितीन बानगुडे पाटील

Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 14 - केंद्रासह राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाने अडीच वर्षांच्या कार्यकाळात जनतेची केवळ दिशाभूल करण्याचे काम केले. थापा देण्यात पटाइत असणारी भाजपा म्हणजे "भारतीय गाजर पार्टी "असा हल्लाबोल शिवसेनेचे उपनेता तथा प्रवक्ते नितीन बानगुडे पाटील यांनी केला. 
अकोला महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर आज जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपने मुंबईत आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन केले. अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कल्याण- डोंबिवली महापालिकेसाठी अडीच हजार कोटी निधीची घोषणा केली होती. राम मंदिराचा मुद्दा छेडला की म्हणे ते आम्ही बांधनारच. शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आग्रही आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना उत्तर प्रदेश मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने तेथील शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या. ही महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल असल्याची टिका कली कापूस, सोयाबीन, तुरीला हमिभाव नाही. नोटाबंदीमुळे शेतकरी हवालदिल असून सर्वसामान्य जनता वेठीस धरल्या गेली. सर्वसामान्यांच्या पाठीशी शिवसेना आज आणि उद्याही भक्कमपने उभी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसैनिक स्वाभिमानी असल्यामुळेच पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडली. त्यामुळे मनपा निवडणुकीत हा स्वाभिमान जोपासण्यासाठी शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ता नितीन बानगुडे पाटील यांनी यावेळी केले.

Web Title: BJP is not "Indian carrot party" - Nitin Bangguide Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.