अकोल्यात महावीर जयंती उत्साहात साजरी; शहरात काढली शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 04:18 PM2018-03-29T16:18:54+5:302018-03-29T16:18:54+5:30

अकोला: सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने गुरुवार, २९ मार्च रोजी चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची २६१६ वी जन्मकल्याणक जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली.

Celebrating Mahavir Jayanti in Akola; procession in city | अकोल्यात महावीर जयंती उत्साहात साजरी; शहरात काढली शोभायात्रा

अकोल्यात महावीर जयंती उत्साहात साजरी; शहरात काढली शोभायात्रा

Next
ठळक मुद्देस्थानीक गांधी जवाहर बाग येथे सकाळी स्तंभ मानवंदना व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. महावीर स्वामींच्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली. आस्था महिला मंडळाच्या वतीने महावीर वंदना सादर करण्यात आली.

अकोला: सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने गुरुवार, २९ मार्च रोजी चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची २६१६ वी जन्मकल्याणक जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. स्थानीक गांधी जवाहर बाग येथे सकाळी स्तंभ मानवंदना व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.या सोहळ्यात हरीश अलिमचंदानी,समाजाचे समाजसेवी केशवराव इंदाने, पंडित शांतीलाल भीमावतं,किशोर विरदावत,जयंती सोहळ्याचे अध्यक्ष सुनील अजमेरा,आयोजन समितीचे रवींद्र जैन,बाबा उपस्थित होते. समाजसेवक अमितकुमार सेठी यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात बागेत असणाº्या महावीर स्वामींच्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली. अंजली बिलाला यांच्या मंगलाचरणाने सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या नंतर आस्था महिला मंडळाच्या वतीने महावीर वंदना सादर करण्यात आली. शांतीलाल भीमावत यांनी प्रास्ताविक सादर करून महावीरांच्या जयजयकार केला. भगवान महावीर यांनी संपूर्ण जगाला अहिंसा व शांतीचा महान संदेश देत गुण्यागोविंदाने जगा व दुसº्याला जगू द्या चा नारा दिला आहे. या विचारावरच आज परमाणू बॉम्ब गोळा करण्याचा दिशेने प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रांनी मार्गक्रमण केले तर नक्कीच जगात शांती व सहिष्णुता नसून या देशांचा संरक्षणाचा खर्च विकास कार्यात जाऊन प्रगती होऊ शकते .म्हणून सवार्नी भगवान महावीर यांच्या विचाराची कास धरण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष हरीश अलिमचंदानी यांनी केले. संचालन व आभार रवींद्र जैन बाबा यांनी केले.

शांतीनाथ चैत्यालयातून निघाली शोभायात्रा
सकाळी वसंत टॉकीज परिसरातील शांतीनाथ चैत्यालय येथून समाजाच्या वतीने गांधी जवाहर बाग पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा वसंत टॉकीज मार्गे,गांधी चौक वरून गांधी जवाहर बाग येथे पोहचून या शोभायात्रेचे समापन करण्यात आले. यावेळी श्रीपाल बिलाला, माणिकचंद झंजरी,शांतीलाल भीमावत,भागचंद बज, महावीर बिलाला,सुशील बाकलीवाल, विनोद भीमावत, रमेश सिहावत, जयेश पंचोली,ललित झंजरी, पावन गोधा, विलास पाटणी, अजय गोधा, अशोक गदिया, अनिल झाजरी, सिद्धू सेठी, विकास जैन, पारस तोरावात, मदन सिहावत, किशोर विरदवात,राजू श्रावगी,मनीष सेठी आस्था महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती झाजरी, विभा बिलाला, निशा सेठी, सपना बिलाला ,रेखा जैन, सारिका बिलाला ,मेघ संधिया, अर्चना गोधा, सुनीता जैन, जुली बिलाला, राजकुमारी बिलाला, हेमा सेठी, किरण वीरदावत,मधू अजमेरा, बबिता झंजरी यांच्यासह शेकडो महिला, पुरुष, बच्चे कंपनी उपस्थित होते.

 

Web Title: Celebrating Mahavir Jayanti in Akola; procession in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.