वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर, कृषी पदवी प्रवेशासाठीही आता  ‘सीईटी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:28 AM2018-01-19T00:28:58+5:302018-01-19T00:34:39+5:30

अकोला : वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर कृषी पदवी  अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सामायिक (सीईटी) परीक्षा घे तली जाणार असून, त्यासाठीची अधिसूचना शासनाने राज्यातील चारही कृषी  विद्यापीठांना पाठवली आहे.

'CET' for admission to agricultural degree, on the basis of medical, engineering degree test | वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर, कृषी पदवी प्रवेशासाठीही आता  ‘सीईटी’!

वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर, कृषी पदवी प्रवेशासाठीही आता  ‘सीईटी’!

Next
ठळक मुद्देशासनाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना पाठवली अधिसूचना अनुदानित व खासगी मिळून राज्यात १९0 कृषी महाविद्यालये बी. एससी. प्रथम वर्षासाठीची एकूण प्रवेश क्षमता १४,७00 विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर कृषी पदवी  अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सामायिक (सीईटी) परीक्षा घे तली जाणार असून, त्यासाठीची अधिसूचना शासनाने राज्यातील चारही कृषी  विद्यापीठांना पाठवली आहे.
राज्यात चार कृषी विद्यापीठे असून, अनुदानित व खासगी मिळून राज्यात १९0  कृषी महाविद्यालये असून, बी. एससी. प्रथम वर्षासाठीची प्रवेश क्षमता एकूण  १४,७00 आहे. कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने स्पर्धा  वाढली आहे. यावर्षी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र  कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली हो ती. 
परराज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमाकडे कल वाढला असून, दरवर्षी  १0 ते १५ टक्के विद्यार्थ्यांची वाढ होत असल्याने पदवी कृषी (बी. एससी.)  सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने  (एमसीएईआर) दोन वर्षांपूर्वीच घेतला होता; परंतु तयारीच झाली नव्हती. 
आता तयारी पूर्ण करण्यात आली असून, यावर्षी म्हणजे २0१८-१९ या  शैक्षणिक वर्षापासून सीईटी घेतली जाणार आहे.

कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सीईटी घेतली जाणार  आहे. त्यासाठीची अधिसूचना प्राप्त झाली आहे. कृषी विद्यापीठाने यासंबंधीची  तयारी केली आहे.
- डॉ.व्ही.एम. भाले, कुलगुरू , 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
- डॉ. बी. वेंकटस्वरलू,  
कुलगुरू , व्हीएनएमोव्ही,परभणी.

Web Title: 'CET' for admission to agricultural degree, on the basis of medical, engineering degree test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.