‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात अकोला मनपा दुस-या क्रमांकावर

By Admin | Published: May 5, 2016 02:48 AM2016-05-05T02:48:27+5:302016-05-05T03:11:59+5:30

शौचालयांची माहिती केंद्र शासनाच्या वेबसाइटवर ‘अपलोड’ महानगरपालिका राज्यात अग्रेसर.

In the 'Clean Maharashtra' campaign, Akola MNP ranked second | ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात अकोला मनपा दुस-या क्रमांकावर

‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात अकोला मनपा दुस-या क्रमांकावर

googlenewsNext

अकोला: केंद्र शासनाच्या 'स्वच्छ भारत'अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनाकडून 'स्वच्छ महाराष्ट्र' अभियान अंतर्गत मनपा क्षेत्रात वैयक्तिक शौचालये उभारली जात आहेत. शौचालयांची इत्थंभूत माहिती केंद्र शासनाच्या वेबसाइटवर 'अपलोड' करणे क्रमप्राप्त असून, या प्रक्रियेत सोलापूर व त्यापाठोपाठ अकोला महानगरपालिका राज्यात अग्रेसर ठरल्या आहेत.
महापालिका क्षेत्रात वैयक्तिक शौचालय नसणार्‍या नागरिकांचा शोध घेऊन, त्यांना शौचालय उभारून देण्यासाठी केंद्र शासनाच्या 'स्वच्छ भारत' अभियान अंतर्गत प्रत्येकी सहा हजार रुपये अनुदान दिले जात आहे. या धर्तीवर राज्य शासनाच्या ह्यस्वच्छ महाराष्ट्रह्ण अभियान अंतर्गत रकमेचा उर्वरित हिस्सा मनपाकडे जमा होत आहे. केंद्रामार्फत दिले जाणारे अनुदान प्राप्त करण्यासाठी शौचालयांची इत्थंभूत माहिती केंद्र शासनाच्या वेबसाइटवर अपलोड करणे आवश्यक असते. शौचालय बांधण्यापूर्वीची स्थिती, खड्डा खोदल्यानंतर आणि बांधकाम पूर्ण केल्याची संपूर्ण माहिती लाभार्थीच्या फोटोसह संबंधित वेबसाइटवर अपलोड करण्याची जबाबदारी संबंधित मनपा प्रशासनाची आहे. माहिती अपलोड करण्याच्या या प्रक्रियेत तूर्तास सोलापूर महापालिका पहिल्या क्रमांकावर, तर त्यापाठोपाठ अकोला महापालिका अग्रेसर ठरली आहे.

Web Title: In the 'Clean Maharashtra' campaign, Akola MNP ranked second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.