धोक्याची जाणीव झाल्यामुळे मधमाशा करतात हल्ला!

By admin | Published: March 10, 2017 06:31 PM2017-03-10T18:31:02+5:302017-03-10T18:31:02+5:30

अलीकडच्या काही दिवसांमध्ये चवताळलेल्या मधमाशांनी रस्त्याने जाणाºया किंवा शेतांमध्ये काम करणाºया मजुरांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत.

Due to the danger of bees attack! | धोक्याची जाणीव झाल्यामुळे मधमाशा करतात हल्ला!

धोक्याची जाणीव झाल्यामुळे मधमाशा करतात हल्ला!

Next

लोकमत ऑनलाइन 

मोहोळांपासून दुर राहा : वन्यजीव अभ्यासकांचा सल्ला
अकोला : अलीकडच्या काही दिवसांमध्ये चवताळलेल्या मधमाशांनी रस्त्याने जाणाऱ्या किंवा शेतांमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. गत आठवड्यात पातुर तालुक्यातील खेट्री परिसरात रस्त्याने जाणाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. वाशिम जिल्ह्यातील जांब शेतशिवारात बुधवारी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात पाच महिला जखमी झाल्या. बुलडाणा जिल्ह्यातही गत आठवड्यात मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाशांद्वारे मानसांवर हल्ला करण्याच्या कारणांचा मागोवा घेतला असता, या हल्ल्यांसाठी मधमाशांना झालेली धोक्याची जाणीव हे मुख्य कारण असल्याचे वन्यजीव अभ्यासकांशी केलेल्या चर्चेतून समोर आले.
घनदाट जंगले, शेतशिवार एवढेच नव्हे, तर पाण्याच्या टाक्या, पडक्या इमारती या ठिकाणी मधमाशांचे मोहोळ लागलेले दिसतात. फुलांचे परागकण गोळा करून मोहोळात मध तयार करण्याचे काम मधमाशा सातत्याने करीत असतात. मधमाशांमध्ये राणी माशी व कामगार माशी असे दोन प्रकार आहेत. राणी माशी ही अंडी घालण्याचे काम करते, तर कामगार माशा या फुलांचे परागकण गोळा करून मध तयार करण्यात काम करतात. सध्या वसंत ऋतु असल्यामुळे सगळीकडे फुलांचे प्रमाण जास्त आहे. फुलांमधून परागकण गोळा करण्यासाठी मधमाशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करीत असतात. सुरक्षीत ठिकाण पाहून मधमाशा मोहोळ तयार करतात. सामान्यपणे मधमाशांचे मोहोळ मानवी संपर्क येऊ नये अशा ठिकाणीच असतात. परंतु एखादेवेळी मनुष्य मोहोळाजवळ आल्यास माशांना धोक्याची जाणीव होते. मोहोळास धोका आहे, असा इशारा राणीमाशी कामगार माशांना देते. त्यानंतर कामगार माशा त्यांच्या मोहोळाजवळ असलेल्या मनुष्यांवर हल्ला करतात, असे वन्यजीव अभ्यासक गोविंद पांडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

तीव्र सुगंध करतो विचलित
मधमाशांची घ्राणेंद्रिये अत्यंत संवेदनशिल असतात. तीव्र स्वरुपाचा सुगंध आल्यास माशा विचलित होतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुगंध किंवा तेल लावलेली व्यक्ती गेल्यास मधमाशा अशा व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते.

मधमाशांची सिमा रेषा निश्चित
मधमाशा या संवेदनशिल असण्यासोबतच त्यांची विशिष्ट सीमा रेषा ठरलेली असते. एका मोहोळावरील मधमाशा या त्यांनी निश्चित केलेल्या परिघातच राहतात. साधारपणे मधमाशा या परिघाचे उल्लंघन करीत नाहीत.

मधमाशा विनाकारण कोणावरही हल्ला करत नाहीत. मोहोळास धोका असल्याची जाणीव झाल्यानंतरच त्या हल्ला करतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुंगंध लावून जाण्याचे टाळावे. - गोविंद पांडे,वन्यजीव अभ्यासक, अकोला.

Web Title: Due to the danger of bees attack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.