शेगाव अग्रसेन पतसंस्थेच्या संचालकांना शिक्षा

By Admin | Published: April 11, 2017 12:20 AM2017-04-11T00:20:15+5:302017-04-11T00:20:15+5:30

न्यायालयात खोटे कागदपत्र दाखल केल्याचे सिद्ध; एक महिना सश्रम कारावास व दंड

Education for Shegaon Agrasan Credit Society Directors | शेगाव अग्रसेन पतसंस्थेच्या संचालकांना शिक्षा

शेगाव अग्रसेन पतसंस्थेच्या संचालकांना शिक्षा

googlenewsNext

खामगाव : न्यायालयात खोटे कागदपत्र दाखल केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने शेगाव अग्रसेन सहकारी पतसंस्था र्मयादित शेगाव शहर शाखा खामगाव येथील व्यवस्थापक व ११ संचालकांना एक महिना सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा १0 एप्रिल रोजी सुनावली. या संचालकांमध्ये शहरातील प्रतिष्ठित व्यापार्‍यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील भुसारा गल्ली भागातील रहिवासी अशोक श्यामसुंदर झुनझुनवाला यांनी शेगाव श्री अग्रसेन सहकारी पतसंस्था शेगावच्या खामगाव शाखेकडून वाहन कर्ज घेतले होते. मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने सदर वाहन पतसंस्थेने जप्त केले होते. यानंतर २00५ मध्ये तीन वेळा सदर कर्जदाराचे कर्जाऊ वाहनाचे हर्रासीबाबत जाहिरात लाउडस्पिकरद्वारे पतसंस्थेच्यावतीने देण्यात आली होती.
लाउडस्पिकरद्वारे वाहन हर्रासीची सूचना देत मानहानी झाल्याप्रकरणी अशोक झुनझुनवाला यांनी येथील न्यायालयात दावा दाखल केला होता.
या प्रकरणात लाउडस्पिकर फिरविण्यासाठी पोलीस स्टेशनची परवानगी घेण्यात आल्याचा जबाब पतसंस्थेकडून न्यायालयात देण्यात आला होता. परवानगीची प्रत सादर करण्यात आली होती. दरम्यान, अशोक झुनझुनवाला यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात २00५ मध्ये लाउडस्पिकर फिरविण्याच्या परवानगीचे अधिकार त्यावेळी पोलीस स्टेशनला होते का? याबाबत माहिती मागितली असता, २00६ पासून लाउडस्पिकरची परवानगी देण्याचे अधिकार ठाणेदारांना देण्यात आले आहेत; मात्र त्याआधी हे अधिकार पोलीस स्टेशन अधिकार्‍यांना नव्हती, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अशोक झुनझुनवाला यांना देण्यात आली. त्यामुळे अग्रसेन पतसंस्थेच्यावतीने सादर करण्यात आलेल्या परवानगीबाबत प्रश्न उपस्थित करीत, न्यायालयात सादर केलेली परवानगी प्रत बनावट असल्याचे झुनझुनवाला यांच्या वकिलांनी सिद्ध केले. त्यामुळे अग्रसेन पतसंस्थेचे व्यवस्थापक व संचालकांनी स्वत:च्या फायद्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्याने, भारतीय दंड विधानच्या कलम ४७१ नुसार एक महिना सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. हा निकाल येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश ए.जी. म्हसके यांनी दिला. दोषी ठरविण्यात आलेल्या संचालकांमध्ये प्रमोद राधेश्याम अग्रवाल, शिवप्रसाद श्रीनिवास पाडिया, विजयकुमार राजकुमार चौधरी, सागर रामेश्‍वर मोदी, जगदीश मदनलाल खेतान, जगदीश रतनलाल अग्रवाल, किशोर भाईलाल गणात्रा, राजेंद्र दीपचंद बडजात्या, संजयकुमार प्रल्हादराय अग्रवाल, नरेंद्र हरनारायण करणानी, सचिन सुभाष बाफना, भगतसिंग भाऊलाल राजपूत आदींचा समावेश आहे. या निकालामुळे सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. याप्रकरणी तक्रारदार अशोक झुनझुनवाल यांच्यावतीने अँड.सी.आर. होतवाणी यांनी काम पाहिले.

शिक्षा झालेल्यांमध्ये प्रतिष्ठितांचा समावेश
याप्रकरणी शिक्षा झालेल्यांमध्ये शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजकांचा समावेश आहे. या निकालामध्ये सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान निकालानंतर तत्कालीन संचालक व एका ज्येष्ठ संचालकांमध्ये वादसुद्धा निर्माण झाला होता.

Web Title: Education for Shegaon Agrasan Credit Society Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.