गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल -दिवाकर रावते
By atul.jaiswal | Published: February 16, 2018 05:29 PM2018-02-16T17:29:13+5:302018-02-16T17:33:13+5:30
अकोला: गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली असून सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना दिला.

पातूर तालुक्यातील भंडारज येथील गारपीटग्रस्त भागाची रावते यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होत. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, अभयसिंह मोहिते, तहसिलदार रामेश्वर पुरी आदींसह कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी रावते यांनी भंडारज येथील गारपीटग्रस्त शेतकरी महेंद्र हरिश्चंद्र शेंडे यांच्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या लिंबू पिकाची पाहणी करुन त्यांना धीर दिला. त्यानंतर गजानन वसंतराव शेंडे यांच्या हरभराच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी रावते म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भातील काही तालुक्यांना मोठया प्रमाणात गारपीटीचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचेज्वारी, हरभरा, फळपीके, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. याची शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. याचबरोबर केंद्र सरकारकडेही 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जावू नये सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल. तसेच बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांनाही लवकरच पैसे दिले जातील, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला.