विचारांचे आदान-प्रदान आत्महत्या कमी करू शकतात
By Admin | Published: December 4, 2014 01:26 AM2014-12-04T01:26:49+5:302014-12-04T01:26:49+5:30
अमेरिकेच्या समुपदेशक जेनी हंटर यांची लोकमतशी बातचित.
राजरत्न सिरसाट /अकोला
शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकर्यांचे समूह गट आणखी बळकट करावे लागतील. या माध्यमातून विचाराची आदान-प्रदान झाल्यास शेतकर्यांमधील एकाकीपणाची भावना कमी होऊन अनेक समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते. आज जी परिस्थिती आहे, उद्याही तशीच राहील असे नाही. त्यामुळे शेतकरी गटामधूनच समुपदेशक तयार करण्याची नितांत गरज असल्याची माहिती अमेरिकेच्या समुपदेशक जेनी हंटर यांनी खास ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ४ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जेनी हंटर अकोल्यात आल्या आहेत. अमेरिकेतील टेक्सास येथे गत ३0 वर्षांपासून त्या ह्यव्यसनाधीनता आणि आत्महत्याह्ण या विषयावर समुपदेशनाचे कार्य करीत आहेत. महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्येचा आकडा बघून, त्या अवाक् झाल्या. त्यामुळे महिला शेतकरी मेळाव्यातून ह्यशेतकरी आत्महत्याह्ण या विषयावर मार्गदर्शन (समुपदेशन) करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रश्न- आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेण्याचे मानसशास्त्रीय कारण काय असू शकते?
उत्तर - एकाकीपणा, आर्थिक स्थिती आणि आपले प्रत्येक मार्ग बंद झाले आहेत, अशी नकारात्मक भावना ज्यावेळी तयार होते, त्यावेळी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेतली जाते. शेती उत्पादनातून झालेला अपेक्षाभंग आणि सर्वत्र होणार्या आत्महत्यांचा परिणामही काहीअंशी इतरांवर होण्याची शक्यता असते.
प्रश्न- आत्महत्या टाळण्यासाठी ठोस उपाययोजना काय असू शकतात?
उत्तर - एकतर तुम्ही एकटे नाही, ही जाणीव त्यांना करू न देणे आवश्यक आहे. परिस्थिती सारखी राहत नाही, परिस्थिती बदलली की दुसर्या दिवशी चूक लक्षात येते. आत्महत्या केल्याने समाजमनावर आणि कु टुंबावर काय परिणाम होतात, याची जाणीव करू न देणे आवश्यक आहे. म्हणूनच शेतकर्यांना शिक्षित करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकर्यांचे शेतकरी समूह गट तयार झाले पाहिजे. या गटांच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाच्या विचाराचे आदान-प्रदान झाले पाहिजे आणि समाज तुमच्यासोबत आहे, याबाबत शेतकर्यांनी एकमेकांना आश्वस्त करणे क्रमप्राप्त आहे. या पद्धतीने शेतकर्यांना मार्गदर्शन मिळाले, तर निश्चितच आत्महत्या कमी होतील.
प्रश्न- आपण,अमेरिकेत याबाबत किती लोकांचे समुपदेशन केले?
उत्तर - मी मूळची इंग्लंडची; परंतु नोकरीनिमित्त अमेरिकेतील एका रुग्णालयात व्यसनाधीनता आणि त्यानंतरचे मानसिक ताणतणाव, पर्यायाने आत्महत्येचा विचार करणार्यांचे समुपदेशन केले. वीस वर्षे नोकरी केल्यानंतर नोकरी सोडली. आता सामाजिक बांधीलकी म्हणून या कामात मी झोकून दिले आहे. ह्यव्यसनाधीनताह्ण या विषयावर मी जास्त काम केले आहे. सातत्याने पाठपुरावा केला तरच व्यसन सुटू शकते. तशाच प्रकारे आत्महत्या करणार्यांच्या मदतीला लोक आहेत, याची जाणीव त्यांना सातत्याने करू न द्यावी लागते. आपल्याला विचारणारं आपुलकीचं कुणी तरी आहे, असं जेव्हा त्या व्यक्तीला वाटू लागतं, त्यावेळी आत्महत्या हा योग्य मार्ग नसल्याचे त्याला वाटू लागते.