व्याळा येथे शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: September 26, 2016 03:18 AM2016-09-26T03:18:57+5:302016-09-26T03:18:57+5:30
सततची नापिकी आणि कर्जाच्या डोंगराला कंटाळून व्याळा येथील वर्षीय शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केली.
व्याळा (जि. अकोला), दि. २५- सततची नापिकी आणि कर्जाच्या डोंगराला कंटाळून व्याळा येथील ३६ वर्षीय शेतकर्याने २५ सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली.
विठ्ठल ऊर्फ सुरेश कात्रे यांच्याकडे सामाईक शेतीतील दोन एकर शेत आहे. त्यांना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न झाले नाही. शेतीची पेरणी करण्यासाठी त्यांनी कर्ज काढले होते. यावर्षीही उत्पन्न नसल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. यातून त्यांनी २४ सप्टेंबर रोजी रात्री १.३0 वाजता विषारी औषध घेतले. ही बाब त्यांच्या पत्नीच्या लक्षात आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पहाटे ५.३0 वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृतक विठ्ठल यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आप्त परिवार आहे.