केळीवेळी येथील शेतकरी पूर्णेच्या पात्रात बेपत्ता
By Admin | Published: September 3, 2016 02:13 AM2016-09-03T02:13:40+5:302016-09-03T02:30:32+5:30
पूर्णा नदीचे पात्र पार करून शेतात जात असताना शेतकरी वाहून गेला.
चोहोट्टा बाजार (जि. अकोला), दि. २: येथील शेतकरी पूर्णा नदीचे पात्र पार करून आपल्या शेतात जात असताना पाण्यात वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. सायंकाळपर्यंत या शेतकर्याचा शोध लागलेला नव्हता.शेतकरी देवीदास किसन बेंडे यांचे शेत केळीवेळी शिवारात नदीच्या पलीकडच्या बाजूने आहे. ते दररोज आपल्या शेतात नदीचे पात्र पार करून जात होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ते आपल्या शेतात जाण्यासाठी पूर्णा नदीचे पात्र ओलांडत असताना अचानक त्यांचा पाय घसरल्याने ते पूर्णेच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेची माहिती येथील ग्राममंडळाने तहसील कार्यालय तथा जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेला दिली. त्यानंतर पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने दिवसभर त्यांचा शोध घेतला; परंतु सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.