पाचवे बालकुमार साहित्य संमेलन अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 07:59 PM2017-11-19T19:59:39+5:302017-11-19T20:22:14+5:30

विदर्भ साहित्य संघाचे अकोला शाखा आयोजित पाचवे बालकुमार  साहित्य संमेलन १ व २ डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स  स्कूल परिसर, अकोला येथे पार पडणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य  आयोजक डॉ. गजानन नारे यांनी रविवारी प्रभात किड्स स्कूलमध्ये आयोजित  पत्रकार परिषदेत दिली. 

Fifth Balkumar Sahitya sammlen held at Akola | पाचवे बालकुमार साहित्य संमेलन अकोल्यात!

पाचवे बालकुमार साहित्य संमेलन अकोल्यात!

Next
ठळक मुद्देविदर्भ साहित्य संघ अकोला शाखे द्वारा आयोजन१ व २ डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कूल परिसर होणार साहित्य संमेलन 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भ साहित्य संघाचे अकोला शाखा आयोजित पाचवे बालकुमार  साहित्य संमेलन १ व २ डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स  स्कूल परिसर, अकोला येथे पार पडणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य  आयोजक डॉ. गजानन नारे यांनी रविवारी प्रभात किड्स स्कूलमध्ये आयोजित  पत्रकार परिषदेत दिली. 
१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता भाषा गौरव दिंडीने संमेलनाला प्रारंभ होईल.  भाषा गौरव दिंडीमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी, लोकसाहित्य ही  मुख्य संकल्पना घेऊन सहभागी होतील. सकाळी १0.३0 वाजता अखिल भारतीय  बालकुमार साहित्य संमेलन पुण्याच्या नियोजित अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते  संमेलनाचे उद्घाटन होईल. संमेलनाध्यक्ष बाल साहित्यिक शंकर कर्‍हाडे यांच्यासह  मुंबई येथील डबिंग व सिनेकलावंत मेघना एरंडे-जोशी, स्वागताध्यक्ष प्रा. ललित  काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यानंतर सिनेकलावंत मेघना एरंडे-जोशी  यांची प्रकट मुलाखत विद्यार्थी अनुष्का जोशी, मेहरा मिरगे, सई देशमुख व साहि ित्यक मोहिनी मोडक या मेघना एरंडे यांची मुलाखती घेतील. दुपारी ३.३0 वाजता  शकुंतलाबाई ओंकारराव मालोकार स्मृती सर्मपित बालक-पालक (मला काहीतरी  सांगायचे) या विषयावर परिसंवाद  होईल. या परिसंवादाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय  व्याख्याते सचिन बुरघाटे हे राहतील. या परिसंवादात विविध जिल्ह्यांमधील बाल प्र ितनिधी सहभागी होणार असून, त्यामध्ये सानिका जुमळे अकोला, तनुश्री दखने  गोंदिया, मृणाल भालेराव चंद्रपूर, मैत्रेयी लांजेवार बुलडाणा, प्रियंका चव्हाण  वाशिम, सिया शेटे ठाणे यांचा समावेश राहील. सायंकाळी कॅम्प फायर होईल.  व्यंगचित्रकार गजानन घोंगडे, बाल समुपदेशक डॉ. प्रदीप अवचार व वर्‍हाडी  साहित्यिक किशोर बळी मनोरंजन करतील. 
२ डिसेंबर रोजी गप्पा-टप्पा कवयित्रीशी, वंचित मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम,  स्व. प्रमिलाताई जैन स्मृती सर्मपित कथाकथन ज्येष्ठ बाल साहित्यिक प्रा. पद्मा  मांडवगणे यांच्या अध्यक्षतेखाली बाल कथाकार उर्वी खडके अमरावती, कल्याणी  देशमुख नागपूर, खुशी कालापाड वाशिम, सिद्धार्थ घुगलिया यवतमाळ, अमिता  ठोसर अकोला व जान्हवी गोरे बुलडाणा या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. दु पारी जागर मराठी कवितांचा हा सांस्कृतिक वाद्यवृंद कार्यक्रम राहील. दुपारी ३.३0  वाजता साहित्यिक तथा उपजिल्हाधिकारी राजेख खवले यांच्या प्रमुख उपस्थितीत  संमेलनाचा समारोप होईल, असेही नारे यांनी सांगितले. याप्रसंगी विदर्भ साहित्य  संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Fifth Balkumar Sahitya sammlen held at Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.