तनमोराच्या संवर्धनासाठी सरसावला वन विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 07:54 PM2017-09-17T19:54:55+5:302017-09-17T19:56:18+5:30
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या तनमोर या अतिदुर्मीळ पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी वन विभाग सरसावला आहे. तनमोराचा अधिवास ओळखून त्याचे संवर्धन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अकोला वन विभाग, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑप इंडिया, द कार्बेट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकोल्यातील निसर्ग परिचय केंद्र येथे रविवार, १७ सप्टेंबर रोजी कार्यशाळा पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या तनमोर या अतिदुर्मीळ पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी वन विभाग सरसावला आहे. तनमोराचा अधिवास ओळखून त्याचे संवर्धन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अकोला वन विभाग, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑप इंडिया, द कार्बेट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकोल्यातील निसर्ग परिचय केंद्र येथे रविवार, १७ सप्टेंबर रोजी कार्यशाळा पार पडली.
तनमोर हा अत्यंत दुर्मीळ असा पक्षी असून, या पक्ष्याची प्रजा ती झपाट्याने नामशेष होत आहे. मुख्यत्वे गवताळ मैदानांवर आढळून येणारा हा पक्षी अत्यंत लाजाळू असून, आज रोजी देशात केवळ ११00 ते १२00 तनमोर आढळून येतात. महाराष्ट्रात फक्त अकोला, वाशिम व यवतमाळ या पट्टय़ात तनमोराचा अधिवास आढळून येतो. लुप्त होत चाललेली तनमोराची प्रजाती वाचविण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने रविवारी निसर्ग परिचय केंद्रात कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उ पवनसंरक्षक पी. जी. लोणकर होते. यावेळी मंचावर शिवाजी महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आय. ए. राजा, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे व शास्त्रज्ञ सुजीत नरवाडे उपस्थित होते. कार्यशाळेत तणमोराबाबत सखोल माहिती देण्यात आली, तसेच हा पक्षी पाहण्यासाठी गरजेच्या असलेल्या संयत्राचा वापर कसा करावा, तणमोराचा अधिवास कसा शोधावा, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. संचालन व प्रास्ताविक वन्यजीव कक्ष प्रमुख गोविंद पांडे यांनी केले, तर आभार वन परिक्षेत्र अधिकारी कातखेडे यांनी केले.आज प्रत्यक्ष पाहणी
अकोला जिल्हय़ात सिसा-मासा, येळवण या भागात तणमोर पक्षी आढळून येतो, तसेच वाशिम जिल्हय़ातील कारंजा तालुक्यातही हा पक्षी आढळतो. अकोला जिल्हय़ात केवळ ५ ते ६ तणमोर पक्षी असल्याची नोंद आहे. कार्यशाळेचा एक भाग म्हणून सोमवार, १८ सप्टेंबर रोजी तणमोराच्या अधिवासाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.