शहीद महेंद्र खांडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By admin | Published: April 19, 2017 08:04 PM2017-04-19T20:04:44+5:302017-04-19T20:04:44+5:30
ब्रह्मी- मूर्तिजापूर तालुक्यातील शहीद सैनिक महेंद्र आकाराम खांडेकर यांच्या पार्थिवावर १९ एप्रिल रोजी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
ब्रह्मी : मूर्तिजापूर तालुक्यातील शेलूनजीक येथील शहीद सैनिक महेंद्र आकाराम खांडेकर यांच्या पार्थिवावर १९ एप्रिल रोजी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
रांची छत्तीसगड येथे आठ महार रेजिमेंटमध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते. नियमित सरावादरम्यान त्यांना हृदयविकाराच्या धक्का बसून त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या प्रथम दर्यापूर व नंतर शेलूनजीक येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी काही वेळ ठेवण्यात आले. त्यानंतर शेलूनजीक गावाशेजारील त्यांच्या शेतात पोलीस व सैन्यदलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी त्यांचा मुलगा वैभव याने चिताग्नी दिली. यावेळी आमदार हरीश पिंपळे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने, तहसीलदार राहुल तायडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराड, नायब तहसीलदार वैभव फरताडे, डाबेराव, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, डॉ. अमित कावरे, रावसाहेब कांबे, अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती बळवंत वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. सैनिक महेंद्र आकाराम खांडेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी सरपंच सुनील सरोदे, ग्रामसेवक मडावी, तलाठी माधुरी खरात, मंडळ अधिकारी आर. एस. जाधव, तलाठी गिरी यांनी १८ एप्रिलच्या रात्री अंत्यसंस्काराची जागा स्वच्छ करण्यापासून ते अखेरपर्यंत परिश्रम घेतले.
‘बेटा, धीर रखो, प्रशासन आपके साथ है!’
यावेळी अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत जिल्हाधिकारी यांनी ‘बेटा, धीर रखो जिला प्रशासन आपके साथ है, पढाईपर ध्यान रखकर पिताजी की इच्छा पुरी करना है’ अशा शब्दांत दिवंगत सैनिक महेंद्र खांडेकर यांच्या मुलाचे सांत्वन केले.