‘श्रीं’चा प्रकट दिन उत्सव : पाऊले चालती संत नगरी शेगावीची वाट, अकोल्यातून भाविकांची शेगावसाठी पायदळ वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:08 AM2018-02-07T10:08:56+5:302018-02-07T10:09:18+5:30
संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने भक्तीच्या ओढीने हजारो गजानन भक्तांची पावले संतनगरीकडे वाटचाल करू लागली आहेत.
अकोला : संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने भक्तीच्या ओढीने हजारो गजानन भक्तांची पावले संतनगरीकडे वाटचाल करू लागली आहेत. मंगळवारी दूपार पासूनच हजारो अकोलेकरांनी शेगावाचा मार्ग धरला असून रात्रभर प्रवास करीत बुधवारी पाहटेपर्यत शेगावात पोहचणार आहेत.
ब्रम्हांडनायक, महाराजाधिराज संत गजानन महाराजांचा प्रकट दिन महोत्सवाचा सोहळा डोळय़ात साठविण्यासाठी आणि आपल्या गुरुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अकोला जिल्हय़ातून हजारो भाविक दरवर्षी जात असतात. गेल्या चार दिवसांपासून जिल्हय़ातील गावोगावीचे भक्त मंडळे, वारकरी गजानन नामस्मरणाचा जयघोष करीत शेगावाला पायदळ वारीने जात आहेत. मंगळवारी सकाळपासून हजारो, महिला, पुरुष, युवक, युवती शेगाव पायदळ वारीने शेगावला निघाले.