जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत  सरकारची इच्छाशक्ती कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:00 AM2017-09-07T01:00:51+5:302017-09-07T01:01:21+5:30

जादूटोणाविरोधी कायदा हा समाजातील  अंधo्रद्धेचे निर्मूलन करण्यासोबतच वैज्ञानिक  दृष्टिकोन रुजविण्यासाठी अतिशय मोलाचे साधन  आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातील सर्वच  राजकीय पक्षांनी या कायद्याला सर्मथन देऊन राष्ट्रापुढे  आदर्श उभा केला आहे. मागील सरकारच्या  कार्यकाळात या कायद्याच्या प्रचार-प्रसाराचे काम  मोठय़ा प्रभावीपणे राबविण्यात आले. विद्यमान  सरकारचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, सामाजिक  न्यायमंत्र्यांसह अनेक बडे नेते या कायद्याच्या  अमंलबजावणीबाबत आग्रही आहेत.

The government's will in the implementation of anti-superstitions Act is less! | जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत  सरकारची इच्छाशक्ती कमी!

जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत  सरकारची इच्छाशक्ती कमी!

Next
ठळक मुद्देश्याम मानव यांची खंत प्रशासकीय यंत्रणा चालना देण्यास ठरत आहे असर्मथगौरी लंकेशची हत्या प्रतिगामींचे कृत्य!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जादूटोणाविरोधी कायदा हा समाजातील  अंधo्रद्धेचे निर्मूलन करण्यासोबतच वैज्ञानिक  दृष्टिकोन रुजविण्यासाठी अतिशय मोलाचे साधन  आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातील सर्वच  राजकीय पक्षांनी या कायद्याला सर्मथन देऊन राष्ट्रापुढे  आदर्श उभा केला आहे. मागील सरकारच्या  कार्यकाळात या कायद्याच्या प्रचार-प्रसाराचे काम  मोठय़ा प्रभावीपणे राबविण्यात आले. विद्यमान  सरकारचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, सामाजिक  न्यायमंत्र्यांसह अनेक बडे नेते या कायद्याच्या  अमंलबजावणीबाबत आग्रही आहेत. मात्र,  प्रशासकीय यंत्रणा प्रचंड शिथिल झाली आहे. या  यंत्रणेमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असून, सरकारी पा तळीवर याबाबत दखल घेतली जात नाही, हे वास्तव  असल्याची खंत अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केली.  ‘लोकमत संवाद’ या उपक्रमांतर्गत मानव यांनी  बुधवारी दुपारी लोकमत कार्यालयात भेट देऊन सं पादकीय चमूशी संवाद साधला. यावेळी निवासी सं पादक रवी टाले यांनी मानव यांचे स्वागत केले. 
‘जादूटोणाविरोधी कायद्याची निर्मिती आणि स्वरूप’  यासंदर्भात विस्तृत माहिती देऊन हा कायदा  कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, तर धर्माच्या  नावावर होत असलेल्या शोषणाच्या विरोधात  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुळातच अंनिसचे कार्य  हे कोणत्याही देव-धर्माविरोधात नाही, आमचा देव- धर्माला विरोध नाही. कुणाला डोळस श्रद्धा ठेवायची  असेल तर माझी हरकत नाही, कारण डोळस होणे  याचाच अर्थ तर्क, चिकित्सा वापरायला सुरुवात  करणे, समाजाची तर्कबुद्धी जागृत करणे एवढेच  अंनिसचे काम आहे. हे काम लोकांना कमीत कमी  दुखावूनसुद्धा अतिशय प्रभावीपणे करता येते,  हे  आम्ही दाखवून दिले. या कार्याला जादूटोणाविरोधी  कायद्याची साथ मिळाल्याने आता वैज्ञानिक  दृष्टिकोनाची रुजवात करणे अधिक सोपे झाल्याचे  आमचे मत आहे. फक्त या कायद्याच्या  अमंलबजावणीमध्ये आलेली शिथिलता झटकून  कामाला लागावे, असे ते म्हणाले. 
कायदा येण्यापूर्वी जी स्थिती होती, त्यामध्ये कायदा  आल्यानंतर प्रचंड बदल झाला आहे. लोकांना आता  जाणीव होऊ लागली आहे. जे धर्म व देवाच्या  नावावर शोषण करीत आहेत, त्यांच्यावरही वचक  बसला आहे. मात्र, या कायद्याची सार्थकता तेव्हाच  आहे, जेव्हा समाजमन वैज्ञानिक दृष्टिकोन  स्वीकारेल. त्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रसार-प्रचार  झाला पाहिजे. 
मधल्या काळात पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले,  कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांना  माहिती झाल्याने अनेक ठिकाणी अधिकार्‍यांनीची  फिर्यादी होत या कायद्याच्या कलमांचा आधार घेत  अनेकांना तुरुंगात पाठवले. ही सुरुवात आहे; ही  प्रक्रिया सातत्याने घडायला हवी. येणारी पिढी ही  अधिक सजग, विज्ञानवादी करायची असेल, तर  विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षित करावे लागेल.  जादूटोणा, भूतप्रेत हे सब झुठ असते, ही बाब  बालवयापासून मनावर बिबवली, तर निर्माण होणारी  वानरसेना अंधo्रद्धा जाळून टाकेल. त्यासाठी शालेय  अभ्यासक्रमांमध्ये या विषयांच्या अनुषगांने धडे द्यावे  लागतील, त्याकरिता सरकारनेच पुढाकार घेतला  पाहिजे. थेट मुंबईपासून तर ग्रामपंचायतपर्यंत तसे  सकारात्मक संदेश देत यंत्रणांना कामाला लावले  पाहिजे व या प्रक्रियेत सातत्य ठेवले पाहिजे, अशी  अपेक्षा मानव यांनी व्यक्त केली. 
दूरचित्रवाणीच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात  अंधo्रद्धेचे अवडंबर माजविले जात आहे. या  माध्यमांवरील अशा प्रकारावर अकुंश ठेवण्यासाठी  सरकारने नेमलेल्या समित्या, त्यांच्या विधी विभाग  याने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत कारवाईची भूमिका घे तली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सामाजिक  चळवळी असोत की राजकीय चळवळी असोत, या  चळवळी निर्माण करणार्‍या नेत्यांच्या अनुयायांनी ने त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविले तर ती  चळवळ वृद्धिंगत होते. मात्र, विचारांपेक्षा व्यक्तीमाहा त्म्य याला प्राधान्य देत देवत्व चिकटविण्याचा प्रकार  हा चळवळींसाठी घातक असतो. विचार हा चिरकाल  टिकणारा तसेच नित्य नवी प्रेरणा देणारा असतो.  त्यामुळे विचारांना वैज्ञानिक कसोटीवर तोलून  त्यामधील सत्यता समोर ठेवता आली पाहिजे. केवळ  माहात्म्य किंवा गोडवे गात राहिला, तर ती चळवळ  क्षीण होते, असे ते म्हणाले. गेल्या सहा महिन्यांपासून  अंनिसने नव्याने कात टाकली आहे. 
प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरे कार्यशाळा  घेऊन तरुणांना प्रशिक्षित केले जात आहे. नवे वक्ते  तयार होत आहेत. ही सर्व शक्ती वैज्ञानिक विचार  रुजविण्यासाठी कामी येणार आहे. समाज विज्ञाननिष्ठ  झाला, प्रत्येक गोष्टीच्या मागील कार्यकारणभाव तपासू  लागला, तर जादूटोणाविरोधी कायद्याच्या  अमंलबजावणीला मोठे पाठबळ मिळेल, असा  आशावाद मानव यांनी व्यक्त केला. 

गौरी लंकेशची हत्या प्रतिगामींचे कृत्य!
पुरोगामी विचार मांडणार्‍या व प्रवाहाविरोधात भूमिका  घेणार्‍यांबाबत प्रतिगामी शक्ती सध्या सक्रिय झाल्याचे  दिसत आहेत. डॉ. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी  यांच्या हत्या प्रकरणात गौरी लंकेश यांच्या हत्येची भर  पडली. ही हत्यासुद्धा प्रतिगामी शक्तींचे काम असावे,  असे सकृतदर्शनी जाणवते. अर्थात पोलीस त पासामध्ये नेमकी बाब स्पष्ट होईलच. मात्र,  विज्ञानवादाची मांडणी करणार्‍यांच्या विरोधात एक  षड्यंत्र काम करीत आहे, हे मान्यच करावे लागेल. 
-

Web Title: The government's will in the implementation of anti-superstitions Act is less!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.